कॅटरिना कैफ झाली जॉन स्नोच्या प्रेमात वेडी! वाचा नेमके काय आहे प्रकरण!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 12:35 IST
अमेरिकन टीव्ही शो ‘गेम आॅफ थ्रोन्स’ सध्या प्रचंड गाजतोय. या शोमध्ये मुख्य भूमिका साकारणा-या जॉन स्नोचे तर विचारू नका. मुली त्याच्यावर अक्षरश: फिदा आहेत. आता या शृंखलेत अभिनेत्री कॅटरिना कैफ हिचे नावही सामील झाले आहे.
कॅटरिना कैफ झाली जॉन स्नोच्या प्रेमात वेडी! वाचा नेमके काय आहे प्रकरण!!
अमेरिकन टीव्ही शो ‘गेम आॅफ थ्रोन्स’ सध्या प्रचंड गाजतोय. या शोमध्ये मुख्य भूमिका साकारणा-या जॉन स्नोचे तर विचारू नका. मुली त्याच्यावर अक्षरश: फिदा आहेत. आता या शृंखलेत अभिनेत्री कॅटरिना कैफ हिचे नावही सामील झाले आहे. ‘मला जॉन स्नो प्रचंड आवडतो. मी ‘गेम आॅफ थ्रोन्स’मध्ये काम करू शकते काय?. प्लीज, प्लीज, मला या शोमध्ये घ्या...’अशी जाहिर विनंती कॅटने केली आहे. होय, अलीकडे कॅटरिनाने इन्स्टाग्रामवर आपल्या एका फोटोशूटचा फोटो शेअर केला. यात कॅट स्विमवेअरमध्ये दिसतेय. तिच्या पायात सुंंदर पैंजणही आहेत. याच फोटोला कॅप्शन देताना कॅटने जॉनबद्दलचे प्रेम व्यक्त करत, ‘गेम आॅफ थ्रोन्स’मध्ये काम मागितले आहे. ‘Can I be in #gameofthrones pleeeeeasseee... #ilovejonsnow #pleasetakemeintheshow’,असे तिने लिहिलेय.‘गेम आॅफ थ्रोन्स’ हा शो डेव्हिड बेनिओफ्फ आणि डी. बी. वेइसद्वारा निर्मित एका अमेरिकन काल्पनिक नाटकाची टीव्ही शृंखला आहे. हे नाटक जॉर्ज आर. आर. मार्टिनच्या ‘अ साँग आॅफ आइस अॅण्ड फायर’ या काल्पनिक कादंबरीवर आधारित आहे. ‘गेम आॅफ थ्रोन्स’ने भारतीयांनाही वेड लावले आहे. कॅटरिनाही यातून सुटली नाही. नाही म्हणायला कॅटरिनाच्या हातात तीन मोठे चित्रपट आहेत. कॅटरिनाचा अलीकडे आलेला ‘जग्गा जासूस’ हा सिनेमा बॉक्सआॅफिसवर आपटला. पण आता कॅटरिनाचे एकापाठोपाठ एक असे तीन चित्रपट येत आहेत. आमिर खानसोबत ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये कॅटरिना आहे. सलमान खानसोबत ‘टायगर जिंदा है’मध्ये ती दिसणार आहे. याशिवाय शाहरूख खानसोबत आनंद एल रायच्या एका चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे. हृतिक रोशनसोबतही ती एका चित्रपटात काम करणार असल्याची खबर आहे. अर्थात बॉलिवूडमध्ये सगळे काही बरे असताना कॅटरिनाला मात्र अमेरिकन शोचे वेध लागले आहेत. शेवटी प्रेमचं ते...आणखी काय?