Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कॅटरिना कैफचा आहे ‘या’ चित्रपटांवर डोळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 14:39 IST

‘टायगर जिंदा है’नंतर कॅटरिना कैफच्या हातात सध्या तरी दोन चित्रपट आहेत. एक म्हणजे, आमिर खानसोबतचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ आणि ...

‘टायगर जिंदा है’नंतर कॅटरिना कैफच्या हातात सध्या तरी दोन चित्रपट आहेत. एक म्हणजे, आमिर खानसोबतचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ आणि दुसरा म्हणजे, शाहरूख खानसोबतचा ‘झीरो’. पण या दोन्ही चित्रपटात कॅटरिना फिमेल लीडमध्ये नाही. म्हणजे, या दोन्ही चित्रपटात दोन अभिनेत्री आहेत.  होय, ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये कॅटरिनासोबत फातिमा सना शेख दिसणार आहे. (आतील बातमी खरी मानाल तर, फातिमाचा रोल कॅटरिनापेक्षा मोठा आणि कितीतरी दमदार असल्याचे म्हटले जातेय.) ‘झीरो’मध्येही कॅटसोबत अनुष्का शर्मा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. त्यामुळे या नव्या वर्षांत काहीतरी ठोस करायचे तर कॅटला ‘सोलो रोल’ हवे आहेत आणि यासाठीच म्हणे कॅटरिना काही बिग बजेट चित्रपटांवर डोळा ठेवून आहे. होय, श्री नारायण सिंग यांचा ‘बत्ती गुल मीटर चालू’, कबीर खानचा कपिल देवच्या आयुष्यावर बेतलेला  ‘1983’ आणि ‘क्रिष4’ हे त्यापैकी काही चित्रपट. अर्थात अद्याप यापैकी कुठल्याही चित्रपटासाठी कॅटचे नाव फायनल झालेले नाही.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  ‘बत्ती गुल, मीटर चालू’ या शाहिद कपूर स्टारर चित्रपटात एका उत्तर भारतीय महिलेच्या भूमिकेसाठी हिरोईन हवी आहे. ‘1983’या चित्रपटासाठी भारताचा  माजी क्रिकेट कर्णधार कपिल देव याची पत्नी रोमी भाटिया हिच्या भूमिकेसाठी हिरोईनचा शोध सुरु आहे. कॅटरिना म्हणे, या दोन्ही भूमिकांसाठी उत्सूक आहे. कॅटरिना कबीर आणि कबीरची पत्नी मिनी माथूर यांच्या अतिशय जवळची आहे. कबीरने याआधीही कॅटसोबत दोन चित्रपटांत काम केले आहे. ‘1983’साठी कॅटला घेण्याची तयारी कबीरने चालवली आहे. ‘बत्ती गुल, मीटर चालू’साठीही कॅटरिनाने प्रयत्न चालवले आहे. याशिवाय हृतिक रोशन स्टारर ‘कृष4’साठीही कॅट इंटरेस्टेड आहे.ALSO READ ; ​कॅटरिना कैफची बहीण इसाबेल आत्तापासून दाखवू लागलीयं अ‍ॅटिट्यूट!आता यापैकी कुठला चित्रपट कॅटच्या हाती लागतो, ते ठाऊक नाही. पण यापैकी कुठलाही चित्रपट मिळाला तर कॅट या संधीचे सोने करेल, यात काहीही शंका नाही.