Join us  

सलमान खाननंतर मदतीसाठी पुढे आली कतरिना कैफ, या दोन ठिकाणी दिले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 1:41 PM

सलमान खानने २५ हजार कामगारांचे बँक डिटेल्स मागवले असून तो त्यांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे.

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान मांडले आहे. त्यात देशातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालल आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केली. यासोबतच त्यांनी पीएम केअर फंडमध्ये डोनेशन देण्यासाठी लोकांना विनंती केली आहे.

आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक कलाकरांनी मदतीचा हात पुढे करत पीएम केअर फंडला मदत केली आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी मदत करण्यासाठी पुढे आले असून वरुण धवन, भुषण कुमार, राजकुमार राव, कपिल शर्मा यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीत काही लाखांची मदत केली आहे. अभिनेता अक्षय कुमारने तर 25 कोटींची मदत केली असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कतरिना कैफने सुद्धा पीएम केअर फंड आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ती पैसे दिले आहेत. याची माहिती कतरिनाने स्वत: इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. कतरिनाने नेमकी किती मदत केली आहे याचा आकडा अजून समोर आला नाही. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना, लिहिते, माझ्या कमाईतील एक छोटा हिस्स मी पीएम केअर फंड आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देते आहे. कोरोना व्हायरसमुळे जे देशाचे नुकसान झालं आहे, त्याचे मला दु:ख आहे.   

सलमान खानची बिईंग ह्युमन ही संस्था आता चित्रपट इंडस्ट्रीशी निगडित असलेल्या २५ हजार लोकांची मदत करणार आहे. सलमान खानने २५ हजार कामगारांचे बँक डिटेल्स मागवले असून तो त्यांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे. सलमान खानने इंडस्ट्रीच्या फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजला फोन करून २५ हजार कामगारांचे बँक डिलेल्स मागवले आहेत. यापूर्वी करण जोहर, आयुष्यमान खुराना, कियारा अडवाणी, तापसी पन्नू, सिद्धार्थ मल्होत्रा, नितेश तिवारी हे देखील कामगारांच्या मदतीसाठी पुढे आले होते. 

टॅग्स :कतरिना कैफकोरोना वायरस बातम्या