Join us

​कॅटरिना कैफने चार महिन्यांत केला ‘हा’ कारनामा! ऐकून दीपिका, आलियालाही बसेल धक्का!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 13:56 IST

कॅटरिना कैफने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. गतवर्षी कॅटरिनाच्या हातात भलेही कुठला मोठा ...

कॅटरिना कैफने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. गतवर्षी कॅटरिनाच्या हातात भलेही कुठला मोठा सिनेमा नव्हता. पण यंदा मात्र कॅटरिना एकमेव अशी अभिनेत्री आहे, जिच्या हातात तिन्ही ‘खान’ सुपरस्टार्सचे चित्रपट आहेत. कॅटरिनाची लोकप्रीयता कुणापासूनही लपून राहिलेली नाही. याचा सर्वात मोठा पुरावा कुठला असेल तर इंटरनेटवरची तिची लोकप्रीयता. होय, उण्यापु-या चार महिन्यांत कॅटरिना सोशल मीडियावर अशी काही लोकप्रीय झाली की, तिने अनेक आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकलेयं. सध्या इन्स्टाग्रामवर कॅटरिनाचे पाच मिलियन म्हणजे, ५० लाख फॉलोअर्स झाले आहेत. इतक्या कमी वेळात कॅटरिनाने इन्स्टाग्रामवर जी लोकप्रीयता मिळवली, ती आश्चर्यकारक आहे. याबाबतील दीपिका पादुकोण व आलिया भट्टसोबत तिची तुलना केल्यास कॅटरिनाने या दोघींना बरेच मागे टाकल्याचे तुमच्या लक्षात येईल.दीपिकाने दोन वर्षांपूर्वी इन्स्टाग्राम ज्वॉईन केले. तर आलिया तीन वर्षांपूर्वी या फोटो शेअरिंग सोशल साईटवर आली. कॅटरिनाला चार महिने १७ दिवसांत ५० लाख फॉलोअर्स मिळालेत. हाच ५० लाखांचा टप्पा गाठायला दीपिका व आलियाला वर्ष लागले होते. सध्या दीपिका व आलियाच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची गोष्ट कराल तर दोघींनी अनुक्रमे १९.७ मिलियन व १७.८ मिलियनचा आकडा पार केला आहे.ALSO READ : ​‘टायगर जिंदा है’च्या सेटवर अचानक इमोशनल का झाली कॅटरिना कैफ? कॅटरिनाची गोष्ट कराल तर सध्या ती ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात बिझी आहे.  यात ती सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ‘टायगर जिंदा है’ हा ‘एक था टायगर’चा सीक्वल आहे. पण हा चित्रपट कबीरऐवजी अली अब्बास जफर दिग्दर्शित करतो आहे. पाच वर्षांनंतर एकत्र येत असलेल्या सलमान व कॅट या दोघांमधील केमिस्ट्री चित्रपट रिलीज होण्याअगोदरच दिसून येत आहे. याशिवाय आनंद एल राय यांच्या शाहरूख खान स्टारर चित्रपटात कॅटरिना दिसणार आहे. एवढेच नाही तर आमिर खानसोबत ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्येही कॅटची वर्णी लागली आहे.