Join us  

कतरिना कैफ-विकी कौशलच्या लग्नाला अर्पिता-अलवीरा राहणार उपस्थित, भाईजानला ही आहे लग्नाचं खास निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 1:54 PM

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding : लग्नाला बॉलिवूडमधील जवळचे मित्र आणि काही VVIP गेस्टही सामिल होणार आहेत.

अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विक्की कौशल  (Vicky Kaushal) 9 डिसेंबरला सिक्स सेंस फोर्ट बरवाडामध्ये लग्न बंधनात अडकणार आहेत.या लग्नाला बॉलिवूडमधील जवळचे मित्र आणि काही VVIP गेस्टही सामिल होणार आहेत. सिस्क सेंस फोर्ट बरवाडाशिवाय ओबेरॉय हॉटेलमध्ये VVIP गेस्टसाठी ८ ते १० टेंटची बुकिंग करण्यात आली आहे.सिक्स सेंस फोर्ट बरवाडामध्ये शाही लग्नाची जय्यत तयारी झाली आहे. रिपोर्टनुसार जवळपास 120 लोक या लग्नात उपस्थित असणार आहेत. 

कतरिना आणि विकीच्या लग्नाची गेस्ट लिस्ट कतरिना आणि विकीच्या शाही लग्नाला फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार लग्नाला बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार्स हजेरी लावणार आहेत. आलिया भट्ट, करण जोहर, सलमान खान, बॉस्को मार्टिस, कबीर खान यांच्यासह अनेकांना आमंत्रित करण्यात आले आहे. यासोबतच कतरिनाच्या लग्नाला सलमान खानच्या कुटुंबातील अनेक सदस्यही उपस्थित राहणार आहेत.

अर्पिता-अलवीरा राहणार हजर कतरिना कैफ खान कुटुंबाच्या किती जवळची आहे हे सर्वांनाच माहीत आहे, सलमान खान कतरिना कैफच्या बेस्ट फ्रेंड्स आणि भाईच्या जवळच्या लोकांमध्ये ती सामील आहे, सलमानची बहीण अलविरा अग्निहोत्री आणि अर्पिता खानशी देखील कतरिना कैफचं नात खास आहे. अलविरा आणि कतरिना खूप खूप चांगल्या मैत्रिणी आहेत, त्यामुळे जर रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर अर्पिता आणि अलविरा दोघीही कतरिनाच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.

वेडिंग प्लानर्सने प्रायव्हसीसाठी पाहुण्यांना सीक्रेट कोड दिले आहेत. ज्याच्या मदतीने ते लग्नात एन्ट्री घेऊ शकतील. या कोडची माहिती केवल वेडिंग प्लानर आणि पाहुण्यांना आहे. इतकंच काय तर हॉटेल स्टाफलाही पाहुण्यांचे हे कोड माहीत नाहीत. त्यांना केवळ पाहुण्यांची संख्या माहीत आहे. कतरिना आणि विक्कीला लग्नाचा एकही फोटो लीक होऊ द्यायचा नाहीये. त्यामुळे त्या पाहुण्यांनाही या टाइट सिक्युरिटीचा भाग बनवलं आहे.

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल