Join us  

अखेर तुम्ही इथे आलात! फोन रुममध्येच ठेवा अन्... पाहुण्यांना कॅट-विकीकडून खास सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 3:36 PM

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding : वेडिंग प्लानर्सने प्रायव्हसीसाठी पाहुण्यांना सीक्रेट कोड दिले आहेत.

कतरिना आणि विकी कौशलच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली आहे.सवाई माधोपूरला पाहुणे येऊ लागले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की, लग्नात उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांना विकी आणि कतरिनाच्या टीमकडून एक नोट दिली जात आहे. या नोटमध्ये पाहुण्यांना एका गोष्टीची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. विकी कौशल आणि कतरिनाच्या शाही लग्नात सहभागी होण्यासाठी सर्व पाहुण्यांनी या नोटमध्ये लिहिलेल्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे.

फोनवर आहे बंदी या शाही लग्नात पाहुण्यांना फोन आणण्यास सक्त मनाई आहे. असे या नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्या चिठ्ठीत लिहिले आहे- 'तुम्ही शेवटी इथे आलात. आशा आहे की तुम्ही जयपूर ते रणथंबोर या रोड ट्रिपचा आनंद घेतला असेल. बसा आणि आराम करा आणि या मचअवेटेड  अॅडव्हेंचरचा आनंद घ्या. आपणा सर्वांना विनंती आहे की आपण आपला मोबाईल खोलीतच ठेवून या सोहळ्याला सहभागी व्हावे. या विवाह सोहळ्यातील कोणत्याही कार्यक्रमाचे फोटो तुम्ही कोणत्याही सोशल साईटवर अपलोड करणार नाही, अशी अपेक्षा आहे.

रिपोर्टनुसार, वेडिंग प्लानर्सने प्रायव्हसीसाठी पाहुण्यांना सीक्रेट कोड दिले आहेत. ज्याच्या मदतीने ते लग्नात एन्ट्री घेऊ शकतील. या कोडची माहिती केवल वेडिंग प्लानर आणि पाहुण्यांना आहे. इतकंच काय तर हॉटेल स्टाफलाही पाहुण्यांचे हे कोड माहीत नाहीत. त्यांना केवळ पाहुण्यांची संख्या माहीत आहे. कतरिना आणि विक्कीला लग्नाचा एकही फोटो लीक होऊ द्यायचा नाहीये. त्यामुळे त्या पाहुण्यांनाही या टाइट सिक्युरिटीचा भाग बनवलं आहे.

लग्नसोहळ्यासाठी विकी आणि कतरिनासह त्यांचे कुटुंबीय राजस्थानमध्ये दाखल झाले आहेत. आज 7 डिसेंबरला संगीत सेरेमनी पार पडणार असल्याचं समजतंय. यामध्ये विकी आणि कतरिना ‘तेरी ओर’ या गाण्यावर डान्स करणार असल्याचं कळतंय.

 

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल