Join us  

PIC : कतरिना कैफला पाहून चाहत्यांना आठवला विकी कौशल, चर्चेत आली सेम टू सेम हुडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 12:37 PM

होय, कालपरवा कॅट तिच्या घराबाहेर स्पॉट झाली आणि तिला पाहून सा-यांना विकीची आठवण झाली.

ठळक मुद्दे  ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यानही दोघांचे वागणे बघून यांच्यात काहीतरी शिजतेय, अशी चर्चा सुरु झाली होती.

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्यात काहीतरी खिचडी शिजतेय. हे आम्ही नाही तर गेल्या काही महिन्यांपासून येत असलेल्या बातम्या म्हणताहेत. सध्या कतरीना कैफ आणि विकी कौशलच्या डेटींगच्या बातम्यांना जोर चढला आहे. गतवर्षी दिवाळी पार्टीत कॅट आणि विकी पहिल्यांदा कॅमे-यांत कैद झाले आणि दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली. आता पुन्हा एकदा विकी व कतरीना यांच्या अफेअरची चर्चा जोरात आहे.  गेल्या शुक्रवारी कॅट व विकीने एकमेकांसोबत ख्रिसमस पार्टी साजरी केली, ते तर झालेच. पण आता दोघेही एकमेकांचे कपडे शेअर करू लागले आहेत. होय, कालपरवा कॅट तिच्या घराबाहेर स्पॉट झाली आणि तिला पाहून सा-यांना विकीची आठवण झाली.

(साभार)

होय, यावेळी कॅटने जी हुडी घातली होती, अगदी सेम टू सेम हुडी विकी कौशलच्या अंगावर कधीकाळी चाहत्यांनी पाहिली होती. होय, 2020 च्या सुरुवातीला विकीने हीच हुडी घाललेला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आता नेमकी तीच हुडी कॅटच्या अंगावर दिसली. आता कॅटने विकीची हुडी घातली की विकीने कॅटची हे आम्हाला माहित नाही. कदाचित दोघांनी मॅचिंग हुडी खरेदी केल्या असतील. पण या हुडीने कॅट व विकीच्या अफेअरच्या बातम्यांना आणखी जोर चढला, हे मात्र नक्की.

गतवर्षी अंबानीच्या दिवाळी पार्टीत कतरीना व विकी एकत्र दिसले होते.  पार्टी संपल्यानंतर दोघेही एकत्र बाहेर पडले होते. पण बाहेर मीडियाला पाहताच दोघांनीही मार्ग बदलला होता. पापाराझींना बघताच कतरीना अक्षरश: भींतीआड लपली होती. दुसरीकडे ‘तो मी नव्हेच’ अशा थाटात विकी कतरीनाला इग्नोर करून एकटा कारमध्ये बसून निघून गेला होता . हा सगळा सीन कॅमे-यात कैद झाला होता. 

  ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यानही दोघांचे वागणे बघून यांच्यात काहीतरी शिजतेय, अशी चर्चा सुरु झाली होती.  कतरीना आणि विकी शेवटच्या रांगेत एकत्रच चित्रपट पाहायला बसले होते. चित्रपट संपल्यावर विकी आणि कतरिना थिएटरच्या दारापर्यंत एकत्र चालत आले परंतु, बाहेर उभ्या असलेल्या फोटोग्राफर्सना पाहून मात्र त्यांनी आपला मार्ग बदलला होता.‘कॉफी विद करण’या शोमध्ये विकीने कतरिनाला डेट करत असल्याच्या बातम्या नाकारल्या होत्या. कतरिना मला आवडते. पण या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही, असे तो म्हणाला होता.

टॅग्स :कतरिना कैफविकी कौशल