कॅटची आई भेटणार नीतू कपूरला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 09:16 IST
२०१६ हे वर्ष बॉलीवूड कपल्ससाठी खुपच भयानक ठरत आहे. अनेक कपल्सचे ब्रेकअप्स सुरू असून घटस्फोटाचे प्रमाणही वाढत आहे. सेलिब्रिटींचे ...
कॅटची आई भेटणार नीतू कपूरला?
२०१६ हे वर्ष बॉलीवूड कपल्ससाठी खुपच भयानक ठरत आहे. अनेक कपल्सचे ब्रेकअप्स सुरू असून घटस्फोटाचे प्रमाणही वाढत आहे. सेलिब्रिटींचे आयुष्य काही सोपे नाही. खरंतर, ब्रेकअप्स जास्त स्ट्रेसफुल असतात आणि पुन्हा एकत्र यायला फारच वेळ लागतो. त्यामुळे एकमेकांच्या आईवडीलांनी त्यांना मान्य केल्याशिवाय कुठलेही पाऊल उचलणे हे धोकादायकच असते. रणबीर क पूर आणि कॅटरीना कैफ यांनी ब्रेकअप करून घेतला. आणि ते कामाच्या बाबतीत तेवढे प्रोफेशनल आहेत की त्यांनी हातात घेतलेल्या कमिटमेंट्स पाळल्या. सुत्रांच्या माहितीनुसार, कॅटरिनाची आई सुझान टर्काेट ही मुंबईत आली असून कॅ टला ब्रेक-अपच्या तणावातून बाहेर यावी यासाठी मदत करण्यासाठी आली आहे. रणबीर-कॅट ज्या फ्लॅटमध्ये एकत्र राहत होते.तिथे ती आली असून असे कळते की, ती रणबीरची आई नीतू कपूरला भेटायला जाणार असल्याचे कळते. बे्रकअपच्या कारणावरून तणाव कमी करण्यासाठी किंवा त्यांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी ती प्रयत्न करत आहे, हे अजून निश्चित नाही.