Join us

कटप्पाच्या मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले पत्र; वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2017 16:34 IST

‘बाहुबली’ या चित्रपटातून प्रचंड प्रसिद्धीस आलेल्या कटप्पा अर्थात सत्यराज याची मुलगी दिव्या सत्यराज सध्या भलतीच चर्चेत आहे. होय, दिव्याने ...

‘बाहुबली’ या चित्रपटातून प्रचंड प्रसिद्धीस आलेल्या कटप्पा अर्थात सत्यराज याची मुलगी दिव्या सत्यराज सध्या भलतीच चर्चेत आहे. होय, दिव्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून, काही कंपन्यांविरोधात एल्गार पुकारला आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटामध्ये कटप्पा नावाचे डॅशिंग पात्र सत्यराज यांनी साकारले होते. अशीच डॅशिंग त्यांची मुलगी असल्याचे दिसून आले आहे. दिव्या रिअल लाइफ हिरो असून, तिने पुकारलेला एल्गार सध्या चर्चेत आहे. दरम्यान, दिव्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात काही औषधनिर्माण कंपन्यांविरोधात कारवाई करण्याची विनंती केली आहे. दिव्या व्यवसायाने न्यूट्रिशियनिस्ट आहे. या कंपन्या दिव्यावर दबाव टाकत होत्या की, तिने त्यांच्या औषधी लोकांपर्यंत पोहचवाव्यात; मात्र या औषधांमध्ये दोष असल्याने दिव्याने त्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता. या औषधांमुळे रुग्णांना डोळ्यांचा त्रास जाणवत होता. काही काळानंतर या औषधांमुळे त्यांचा मृत्यूही होण्याची शक्यता होती. त्यामुळे तिने या औषधी रुग्णांना देण्यास नकार दिला. दिव्याचा हा नकार मात्र त्या कंपन्यांना चांगलाच झोंबला. त्यांनी दिव्याला धमकविण्यास सुरुवात केली. शिवाय आम्ही राजकीय दबाव टाकून तुला या औषधी विकण्यास भाग पाडू, अशी धमकीही दिली; मात्र दिव्यानी या धमक्यांना अजिबात भीक घातली नाही. उलट त्यांच्याविरोधात एल्गार पुकारत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच एक पत्र लिहून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. दिव्याऐवजी इतर कोणी असते तर कदाचित या कंपन्यांच्या धमक्यांना बळी पडले असते. परंतु दिव्याने त्यास प्रखरतेने विरोध केला. दिव्याच्या याच धाडसामुळे सध्या ती सर्वत्र चर्चेत आहे.