पतीसोबत सनी एन्जॉय करतेय काश्मीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 17:43 IST
बॉलिवूडमधली हॉट अभिनेत्री सनी लिओनी सध्या पती डेनियलसह काश्मीरमधली व्हेकेशन एन्जॉय करतेय. नुकतीच सनी शाहरुख खानच्या रईसमध्ये लैला ओ ...
पतीसोबत सनी एन्जॉय करतेय काश्मीर
बॉलिवूडमधली हॉट अभिनेत्री सनी लिओनी सध्या पती डेनियलसह काश्मीरमधली व्हेकेशन एन्जॉय करतेय. नुकतीच सनी शाहरुख खानच्या रईसमध्ये लैला ओ लैला या गाण्यात दिसली होती. यानंतर ती पतीसह सुट्ट्या एन्जॉय करताना दिसतेय. सनीने सोशलमीडियावर तिचे काश्मीरमधले फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना भरभरुन हिट्स आणि लाइक मिळतायेत. सनीने परिधान केलेल्या पिंक कलरच्या जॅकेटमध्ये ती खूपच सुंदर होती. फोटोंमध्ये ती पतीसह काश्मीरमधलो स्नो फॉल एन्जॉय करताना दिसतेय. काश्मीरने बॉलिवूडमधल्या प्रत्येक दिग्दर्शकला आपल्या सौंदर्यांने भूरळ घातली आहे. भारतातले जन्नत अशी काश्मीरची ओळख आहे. सनीने शिकार बोटमधून ही फेरफटाका मारला. फोटोंमध्ये गुलमर्गमध्ये सनीने बर्फात पती सोबत खूप धमाल मस्ती केल्याचे दिसतेय. यावेळी तिच्यासोबत तिचे काही मित्र ही होते. सूत्रांच्या माहितीनुसार काश्मीरमध्ये तिच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आली आहे. बिग बॉसमध्ये येण्याआधी सनीची ओळख एक पोर्न स्टार म्हणून होती. बिग बॉस हा रिअॅलिटी शो सनीच्या करिअरचा ट्रनिंग पॉईंट ठरला. बिग बॉसनंतर तिला बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांमध्ये आयटम साँग करायला मिळाले. सनीने त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने त्याचा मादक अदांनी सगळ्यांना घायाळ केले. रइसमधल्या त्याच्या लैला ओ लैला या गाण्यांमधला सनीचा अंदाज माहिरा खान खूपच भावला होता. तसे पाहिला गेले तर बॉलिवूडमध्ये नेहमीच चित्रपटाच्या सेटवर कॅट फाइट झाल्याच्या बातम्यासमोर येत असतात. मात्र शाहरूखच्या ‘रईस’मधील दोन्ही अभिनेत्री एकमेकींचे कौतुक करीत असल्याने हा दुर्मिळ योग समजला जात आहे.