Join us
Daily Top 2Weekly Top 5

'लुका-छिपी'मध्ये कार्तिक आर्यन आणि क्रिती सॅनन शेअर करणार स्क्रिन, लवकरच सुरु होणार शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 16:26 IST

'सोनू के टीटू के स्वीटी'च्या यशानंतर कार्तिक आर्यन सध्या सातव्या आसमानपर आहे कारण त्याच्या झाळीत अनेक सिनेमा येऊ लागले आहेत. मात्र तो सिनेमा विचारपूर्वक साईन करतोय.

ठळक मुद्दे कार्तिक आर्यन आणि क्रिती सॅनन यांची जोडी 'लुका-छिपी'मध्ये दिसणार आहे 'लुका-छिपी'चे शूटिंग ग्वालियर, मथुरा आणि आग्रामध्ये होणार आहे

'सोनू के टीटू के स्वीटी'च्या यशानंतर कार्तिक आर्यन सध्या सातव्या आसमानपर आहे कारण त्याच्या झाळीत अनेक सिनेमा येऊ लागले आहेत. मात्र तो सिनेमा विचारपूर्वक साईन करतोय. काही दिवसांपासून चर्चा आहे की, कार्तिक आर्यन 'लुका-छिपी'मध्ये दिसणार आहे. यात त्याच्यासोबत क्रिती सॅननसुद्धा झळकणार आहे. 

कार्तिक आणि क्रिती दिनेश विजन यांच्या आगामी सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. दोघांनी या सिनेमाची तयारी सुद्धा सुरु केली आहे. तसेच लवकरच शूटिंग सुद्धा सुरु करणार आहेत. 'लुका-छिपी'चे शूटिंग ग्वालियर, मथुरा आणि आग्रामध्ये होणार आहे. यात कार्तिक एक लोकल टीव्हीचा स्टार रिपोर्टरची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर क्रिती सॅनन त्याच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारणार आहे. यासिनेमात दोघांना प्रादेशिक भाषा बोलायची आहे यासाठी दोघे खूप मेहनत घेतायेत.   

 कार्तिक आर्यन याच्या हाती एक मोठा चित्रपट लागला होता. पण केवळ अतिउत्साहामुळे कार्तिकला हा चित्रपट गमवावा लागला. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटात करिना कपूर आणि अक्षय कुमारला लीड रोलमध्ये होते आणि कार्तिकला सर्पोटींग रोलमध्ये घेतले जाणार होते. कार्तिक लवकरच हा चित्रपट साईन  करणार होता. याचसाठी कार्तिकच्या पीआर टीमने करण जोहरच्या कार्यालयाशी संपर्क साधला. पण तोपर्यंत उशीर झाला होता. होय, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक व त्याच्या टीमचा अतिउत्साह याला कारणीभूत होता.

कार्तिक आर्यन लवकरच कन्नड चित्रपट 'किरिक पार्टी'च्या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'किरिक पार्टी' हा कन्नड चित्रपट यावर्षी फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती आणि हा चित्रपट शंभर दिवसांहून अधिक काळ चित्रपटगृहात होता. कन्नडमध्ये जास्त कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे. हा चित्रपट प्रेमकथेवर आधारीत असून इंजिनिअरिंग महाविद्यालयात फर्स्ट इयरला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची कथा रेखाटण्यात आली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते गुजराती दिग्दर्शक अभिषेक जैन करणार आहेत. 

टॅग्स :कार्तिक आर्यनक्रिती सनॉन