Join us

ऐकावं ते नवलंच! कार्तिक आर्यन म्हणतो, मला बायको हवी तर दीपिका पादुकोणसारखीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 14:42 IST

कार्तिक आर्यन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केले आहे.लॉकडाऊन दरम्यान कार्तिक सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. कार्तिक फनी व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतो. कार्तिक आर्यन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कार्तिकला बायको हवी ती दीपिका पादुकोणसारखी. कार्तिकने यामागाचे कारण देखील सांगितले आहे.  एका मुलखती दरम्यान कार्तिकने सांगितले की, त्याला दीपिका पादुकोण आवडते. ऐवढेच नाही तर त्याला लग्नासाठी दीपिका पादुकोणसारखी मुलगी हवी. दीपिका पादुकोण जगासमोर आपल्या पतीसोबत  मोठ्या शानने उभी रहाते. 

कार्तिक आर्यनने दीपिका पादुकोणसोबत एअरपोर्टला डान्स करताना दिसला होता. तो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.  कार्तिकने  दीपिकाला पती पत्नी और वो सिनेमातील  धीमे-धीमे गाण्यातील डान्स स्टेप शिकवल्या होत्या.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर  कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी ‘भूल भुलैया 2’मध्ये दिसणार आहे..पहिल्यांदाच कार्तिक आर्यन रोमँटिक व चॉकलेटी हिरोच्या भूमिकेतून बाहेर पडल अॅक्शन चित्रपटात नशीब आजमावताना दिसणार आहे.. ओम राऊत या सिनेमाचे दिग्दर्शन करणार  आहे.

टॅग्स :कार्तिक आर्यनदीपिका पादुकोण