Join us
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिक आर्यनच्या बहिणीचा ‘घोळात घोळ’, पाहा मजेदार व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 11:18 IST

कार्तिकने किट्टूचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. एअरपोर्टवरचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.  

ठळक मुद्देग्वाल्हेरहून मुंबईला इंजिनिअरींग करायला जातो सांगून आलेल्या  कार्तिक आर्यनला बराच स्ट्रगल करावा लागला. पण आता तो तरूणींमध्ये एक चार्मिंग चेहरा म्हणून लोकप्रिय आहे.

अभिनेता कार्तिक आर्यन सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असतो. तो सतत बहिण कृतिका तिवारी अर्थात किट्टूसोबतचे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत असतो.  आता कार्तिकने किट्टूचा असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. एअरपोर्टवरचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.  होय, किट्टूने काय केले तर मोठ्ठा घोळ घातला. तिने काय करावे तर, एक महिनाआधीच बॅग पॅक करून विमानतळावर पोहोचली. 12 फेबु्रवारीला विमानात बसण्यासाठी ती एअरपोर्टवर गेली आणि मग काय, किट्टूला विमानतळावरून तसेच परतावे लागले. 

होय, कार्तिकला कदाचित किट्टूने घातलेला घोळ माहिती असावा. पण तो गप्प राहिला. आई व तो किट्टूला विमानतळावर सोडायलाही गेलेत. किट्टू विमानतळावर पोहोचली. सामान घेऊन एन्ट्री गेटपर्यंत गेली. पण सुरक्षा कर्मचाºयांनी तिला परत पाठवले. कारण किट्टूच्या हातात 12 फेबु्रवारीचे नाही तर 12 मार्चचे तिकिट होते. आपण एक महिन्याआधीच विमानतळावर पोहोचल्याचे तेव्हा कुठे किट्टूच्या ध्यानात आला. मग काय, तिने तिथेच कपाळावर हात मारून घेतला. कार्तिकला सगळे काही माहित होतेच. तरीही क्या हुआ असे म्हणत, त्याने किट्टूची चांगलीच मजा घेतली. कार्तिक व त्याच्या आई जोरजोरात हसू लागले. किट्टूसाठी तारीख म्हणजे फक्त नंबर आहे, असे लिहित कार्तिकने हा मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे.

ग्वाल्हेरहून मुंबईला इंजिनिअरींग करायला जातो सांगून आलेल्या  कार्तिक आर्यनला बराच स्ट्रगल करावा लागला. पण आता तो तरूणींमध्ये एक चार्मिंग चेहरा म्हणून लोकप्रिय आहे. बॉलिवूडमध्ये कार्तिक आर्यनची डिमांड वाढली आहे. ‘प्यार का पंचनामा’ मध्ये दिलेल्या त्याच्या मोनोलॉगने त्याला सोशल मीडियावर हिट करून सोडले. यानंतर कार्तिकचा ‘सोनू के टीटू की स्वीटी’ हा सिनेमाही चांगलाच गाजला होता. या सिनेमाने १०० कोटींपेक्षाही जास्त कमाई केली होती.

टॅग्स :कार्तिक आर्यन