Join us
Daily Top 2Weekly Top 5

 कार्तिक आर्यनचा नवा फंडा; ‘नकोशा’ निर्मात्यांना दूर ठेवण्यासाठी लढवली अजब शक्कल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 11:48 IST

मेनस्टिम चित्रपटांमागे न धावता कार्तिकने सोनू के टीटू की स्वीटी, प्यार का पंचनाम, प्यार का पंचनामा 2, आकाशवाणी असे वेगवेगळ्या धाटणीचे हिट चित्रपट दिलेत आणि अचानक निर्मात्यांच्या नजरेत आला.

ठळक मुद्देसध्या कार्तिक आर्यन इम्तियाज अलीच्या ‘लव आज कल 2’ या चित्रपटात बिझी आहे.

‘सोनू के टीटू की स्वीटी’ आणि पाठोपाठ ‘लुका छुपी’ या दोन चित्रपटांच्या यशानंतर अभिनेता कार्तिक आर्यन सध्या जोरात आहे. मेनस्टिम चित्रपटांमागे न धावता कार्तिकने सोनू के टीटू की स्वीटी, प्यार का पंचनाम, प्यार का पंचनामा 2, आकाशवाणी असे वेगवेगळ्या धाटणीचे हिट चित्रपट दिलेत आणि अचानक निर्मात्यांच्या नजरेत आला. हेच कारण आहेत की, कार्तिकने आपल्या फीमध्ये वाढ केली आहे. पण फी वाढवण्यामागे चित्रपटांच्या यशासोबतच आणखी एक कारण आहे. हे कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

 ताजी चर्चा खरी मानाल तर, कार्तिकने फीमध्ये घसघशीत वाढ केली आहे. यामागे एक खास कारण आहे. होय, ज्यांच्यासोबत काम करायचे नाही, अशा निर्मात्यांना दूर ठेवण्यासाठी कार्तिकने म्हणे, आपली फी अव्वाच्या सव्वा वाढवली आहे. त्याच्या फीचा आकडा बघून, निर्मात्यांचे डोळे पांढरे होतात. साहजिकच,अनेकजण त्याच्याजवळही फिरकत नाहीत आणि अशाप्रकारे ज्यांच्यासोबत काम करायचे नाही, असे निर्माते त्याच्यापासून आपसूक दूर राहतात. अर्थात मोठ्या निर्मात्यांसोबत काम करताना कार्तिक स्वत:हून आपल्या फीमध्ये कपात करतो. कार्तिकचा हा फंडा अनेकांसाठी नवा आहे. पण तो पाहून बॉलिवूडच्या अनेकांची कार्तिकबद्दल ‘काना मागून आला अन् तिखट झाला’ अशीच भावना झाली नसेल तर नवल.

सध्या कार्तिक आर्यन इम्तियाज अलीच्या ‘लव आज कल 2’ या चित्रपटात बिझी आहे. यात तो सारा अली खानसोबत झळकणार आहे. याशिवाय ‘पती, पत्नी और वो’च्या रिमेकमध्येही कार्तिकची वर्णी लागली आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर, अनन्या पांडे त्याच्यासोबत दिसणार आहेत.

टॅग्स :कार्तिक आर्यन