Join us
Daily Top 2Weekly Top 5

आज खुश तो बहुत होगे तुम...! कार्तिक आर्यनने शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 15:19 IST

बॉलिवूडचा हँडसम अ‍ॅक्टर कार्तिक आर्यन सध्या जाम खूश आहे. पण सारा अली खानमुळे नाही तर...

ठळक मुद्दे कार्तिक व सारा ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेत आणि दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडले.

बॉलिवूडचा हँडसम अ‍ॅक्टर कार्तिक आर्यन सध्या जाम खूश आहे. पण सारा अली खानमुळे नाही तर अमिताभ बच्चन यांच्यामुळे. होय, कार्तिक अमिताभ बच्चन यांचा खूप मोठा चाहता आहे. अलीकडे कार्तिकला अमिताभ यांना भेटण्याची संधी मिळाली. केवळ भेटण्याची नाही तर त्यांचा ऑटोग्राफ घेण्याची संधी त्याला लाभली. साहजिकच कार्तिकचा आनंद गगनात मावेनासा झाला. या ‘फॅन मोमेंट’चा व्हिडीओ कार्तिकने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला आहे.या व्हिडीओत कार्तिक अमिताभ यांचा ऑटोग्राफ घेताना दिसतोय. त्याच्या चेह-यावर तोच आनंद आहे, जो सामान्य चाहत्याला त्याच्या आवडत्या स्टारला भेटून होतो. ऑटोग्राफ दिल्यानंतर अमिताभ कार्तिकला मिठी मारतात. 

‘आज खुश तो बहुत होगे तुम! डाय हार्ट मोमेंट...महानायक अमिताभ बच्चन याच्या बाजूला उभा राहून त्यांना ऑटोग्राफ साईन करताना बघत होतो. शूटींगदरम्यान  तुमच्यासोबत शानदार वेळ घालवला. आता  दिल मांगे मोअर...,’ असे कार्तिकने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले.यापूर्वी कार्तिकने अमिताभ यांच्यासोबतचा शूटींगदरम्यानचा एक फोटो शेअर केला होता. अमिताभ व कार्तिक दोघेही एका जाहिरातीत एकत्र दिसणार आहेत.

कार्तिक सध्या ‘पती, पत्नी और वो’ आणि ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटांत बिझी आहे.  सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांची लव्हलाईफ सध्या जाम चर्चेत आहेत. सध्या दोघेही सर्रास एकत्र फिरताना दिसतात.  कॉफी विथ करण  या चॅट शोमध्ये साराने कार्तिकसोबत कॉफी डेटला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून या दोघांची चर्चा सुरू झाली.

त्यानंतर लोकमत स्टाईल अवार्ड सोहळ्यात रणवीर सिंगने सारा व कार्तिकची भेट घालून दिली होती. यानंतर कार्तिक व सारा ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेत आणि दोघेही नकळत एकमेकांच्या प्रेमात पडले.

टॅग्स :कार्तिक आर्यनसारा अली खानअमिताभ बच्चन