Join us

कार्तिक आर्यन पोहोचला स्कोर ट्रेंड्सच्या टॉपमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 12:07 IST

‘प्यार का पंचनामा’ने बॉलीवूडमध्ये अभिनेता कार्तिक आर्यनला ओळख मिळवून दिली. मात्र नुकत्याच रिलीज झालेल्या सोनू के टिटू की स्वीटी ...

‘प्यार का पंचनामा’ने बॉलीवूडमध्ये अभिनेता कार्तिक आर्यनला ओळख मिळवून दिली. मात्र नुकत्याच रिलीज झालेल्या सोनू के टिटू की स्वीटी चित्रपटाच्या यशाने कार्तिकला सर्वाधिक फायदा झाला. ह्या सिनेमाच्या यशामुळे कार्तिकच्याही लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली आहे. 2011 ला बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलेला कार्तिक आपल्या समकालीन अभिनेत्यांपेक्षा रँकिंगमध्ये मागे राहिला होता मात्र आता कार्तिकने स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर अभूतपूर्व बाजी मारली आहे. 50व्या स्थानावरून कार्तिक आर्यनने 25व्या क्रमांकावर उडी मारली आहे. थोडक्यात 100 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचलेल्या त्याच्या चित्रपटातल्या सोनू ह्या भूमिकचा कार्तिकला त्याच्या करियरमध्ये चांगलाच फायदा झालाय. बिग स्टारर सिनेमांच्या गर्दीत एका सिनेमाने मात्र सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. , बडे बडे ट्रेड पंडितही या सिनेमाची घोडदौड पाहून आश्चर्यचकित झालेत. ‘सोनू के टीटू की स्वीटी’. होय, कुणालाही अपेक्षित नसताना या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर अशी काही कमाई केली की, सर्वच चकित झालेत. भारतीय बॉक्सआॅफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 70 कोटींची कमाई केली आहे. वर्ल्ड वाईड बॉक्सआॅफिसचे म्हणाल तर या चित्रपटाचे कलेक्शन 100 कोटींवर पोहोचले आहे.कार्तिकच्या करीयरमध्ये आलेल्या चढ-उतारांकडे पाहता, स्कोर ट्रेंड्स स्पष्टीकरण देते की, कार्तिकची चॉकलेट बॉय इमेज आणि त्याची युवापिढीत असलेली लोकप्रियता पाहता, त्याच्या रँकिंगमध्ये बदल जाणवतोय.  अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल ह्याविषयी सांगतात, “आम्ही 14 भारतीय भाषांमधल्या 600 बातम्यांच्या स्रोताव्दारे हा डेटा एकत्र केला आहे. मीडियामध्ये उपलब्ध आकडेवारीनुसार, हा डेटा मिळतो." अश्वनी पुढे सांगतात, "कार्तिकचे रिपोर्ट कार्ड पाहता,सध्या फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लेटफार्मे्सवर त्याची वाढती लोकप्रियता तसेच, वायरल आणि डिजिटल बातम्या आणि प्रिंट माध्यमामध्ये गेल्या महिन्याभरात लिहील्या गेलेल्या लेखांमुळे तो यशाच्या 25 पाय-या एवढ्या लवकर चढू शकला." स्कोर ट्रेंड्सच्यानुसार, आपल्या वाढत्या लोकप्रियताचा फायदा आता कार्तिक आर्यनला ब्रँड एन्डॉर्समेन्ट्सच्या ऑफर्स मिळवण्यात आणि निर्मात्यांकडून वाढीव फी आकरण्यात होऊ शकतो.