Join us

करिना का पडलीय एकटी? सैफ कुठे झालाय गायब?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2016 15:21 IST

करिना कपूर आणि सैफ अली खान सध्या कोणत्याच कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावत नाहियेत. इंडस्ट्रीत होत असलेल्या सगळ्या कार्यक्रमांना करिना ...

करिना कपूर आणि सैफ अली खान सध्या कोणत्याच कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावत नाहियेत. इंडस्ट्रीत होत असलेल्या सगळ्या कार्यक्रमांना करिना सध्या एकटीच जात असल्याचे दिसत आहे. हे वाचल्यावर करिना आणि सैफमध्ये काही भांडणं झाली आहेत का... हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेला असेल. पण करिना आणि सैफ यांच्यात सगळे काही सुरळीत असून त्यांच्यात कोणताही वाद नाहीये. सैफ सध्या कार्यक्रम, पार्टींना न येण्याचे एक वेगळेच कारण आहे. देल्ही बेल्ही या चित्रपटाचा लेखक अक्षत वर्मा हा एक चित्रपट दिग्दर्शित करत असून या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मुंबईच्या विविध भागांमध्ये केले जात आहे. पटकथेच्या मागणीनुसार रात्रीचे चित्रीकरण करणे गरजेचे असल्याने तो रात्रीच्या वेळात कोणत्याच कार्यक्रमात दिसत नाहीये. यामुळे करिनाला कुठेही एकटे जाण्याशिवाय पर्यायच नाहीये.