करिना म्हणते, ही विश्रांतीची वेळ नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2016 21:22 IST
करिअरच्या सुरुवातीला हटके भूमिका करण्यापासून तर मोठ्या बजेटच्या चित्रपटांमध्ये लहान भूमिका करण्यापर्यंत सगळ्याच बाबतीत करिना कपूर खान चर्चेत राहिली. ...
करिना म्हणते, ही विश्रांतीची वेळ नाही
करिअरच्या सुरुवातीला हटके भूमिका करण्यापासून तर मोठ्या बजेटच्या चित्रपटांमध्ये लहान भूमिका करण्यापर्यंत सगळ्याच बाबतीत करिना कपूर खान चर्चेत राहिली. करिनाने नेहमीच स्वत:चे नियम स्वत: आखले. येत्या डिसेंबरमध्ये करिना बाळाला जन्म देणार आहे. सध्या करिना प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. पण असे असले तरी ती कामापासून ब्रेक घेण्याच्या मूडमध्ये नाहीय. तुम्हाला तुमच्या कामाप्रति प्रेम असेल तर अनेक गोष्टी सहजसोप्या होतात. एका अभिनेत्रीचे लग्न होण, ती आई होणे,या अतिशय स्वाभाविक गोष्टी आहेत. माझ्यामते अनेकदा लोक याबद्दल अधिक विचार करतात. मी अभिनेत्री आहे कदाचित म्हणून माझ्यावर प्रश्नांचा भडिमार होतो. पण अभिनेत्री न राहता मी एखादी शेफ वा अन्य काही असते तरिही गर्भावस्थेत मी माझे काम असेच सुरू ठेवले असते. मी अभिनयावर मनापासून प्रेम करते. मग मी माझे हे काम बंद का करू, असे करिना म्हणाली. आता करिनाचा तिच्या कामाप्रति इतकी समर्पित आहे म्हटल्यावर तिला आपण रोखणारे कोण? होय ना?