Join us

करिना कपूर कुणाला करतेय डेट? जाणून घेण्यासाठी वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 12:04 IST

‘कॉफी विथ करण’ या दिग्दर्शक करण जोहर याच्या चॅट शोवर अनेक स्टार्सची गुपितं उघडकीस येतात. आत्तापर्यंतच्या आयुष्यातले अनेक खुलासे ...

‘कॉफी विथ करण’ या दिग्दर्शक करण जोहर याच्या चॅट शोवर अनेक स्टार्सची गुपितं उघडकीस येतात. आत्तापर्यंतच्या आयुष्यातले अनेक खुलासे या शोद्वारे सर्वांसमोर येतात. आता हेच पाहा ना, ‘कॉफी विथ करण’च्या शोवर करिना कपूर आणि सोनम कपूर या दोघी आल्या होत्या. नुक तेच या चॅट शोचे शूटिंग करण्यात आले. ‘बॉलिवूडची बेबो’ करिना कपूर खान हिने या शोवर सैफशिवाय दुसऱ्या  कुणासोबत तरी डेटवर जाण्याचे कबूल केले आहे. कोण आहे हा व्यक्ती? तुम्हाला उत्सुकता लागलीच असणार... तो कोण आहे ज्याच्यासोबत बेबो डेटवर जाऊ इच्छिते. होय, करण जोहरसोबत बेबोला जायचंय डेटवर...}}}}अभिनेत्री करिना कपूर खानचा स्वभाव हा खुपच कॉमेडी करणारा आहे.  अलीकडेच ती करणच्या शोवर ‘मस्सकली गर्ल’ सोनम कपूर सोबत आली त्यावेळी करणने सोनमला विचारले की, ‘तू कोणासोबत डेटिंगवर जाऊ इच्छितेस?’ तेव्हा तो माझा वैयक्तिक प्रश्न असल्याचे म्हणत तिने उत्तर देण्यास नकार दिला. मात्र, हाच प्रश्न करणने जेव्हा बेबोला विचारला तेव्हा तिने तिच्या खास अंदाजात या प्रश्नाचे उत्तर दिले. ती म्हणाली,‘मला तुझ्यासोबत डेटवर जायला आवडेल, करण. माझी आई तर म्हणते,‘टीव्ही लावा आणि करणसोबत डेट करा.’ तिच्या अशा गमतीदार उत्तरानंतर करणने सोनमला दीपिका, अनुष्का, आलिया आणि प्रियांका यांना ‘रेट’ देण्याबद्दल विचारले. तेव्हा ती म्हणाली,‘मी कुणालाही रेट करू इच्छित नाही. फक्त स्वत:ला रेट देणार..आय अ‍ॅम दी बेस्ट.’ ही पहिलीच वेळ असेल जेव्हा करिना आणि सोनम एकत्र दिसत आहेत.}}}}पतौडीचा नवाब सैफ अली खान आणि बेगम करिना कपूर खान यांना एक महिन्यापूर्वी तैमूर अली खान हा मुलगा झाला. लवकरच करिना पुन्हा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. सोनम कपूरला ‘नीरजा’चित्रपटासाठी अलीकडेच ‘स्टारडस्ट अ‍ॅवॉर्ड’मध्ये बेस्ट एक्ट्रेसचा अ‍ॅवॉर्ड मिळाला आहे. याअगोदर सोनम कपूर तिचे वडिल अनिल कपूर यांच्यासोबत शोवर आली होती.