Join us
Daily Top 2Weekly Top 5

​करिनाच्या ‘रंग में भंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 05:08 IST

सध्या ‘की अ‍ॅण्ड का’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असलेल्या करिनाला गत सोमवारी काहीसा निवांत मूड मिळाला. मग काय करिनाने ...

सध्या ‘की अ‍ॅण्ड का’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी असलेल्या करिनाला गत सोमवारी काहीसा निवांत मूड मिळाला. मग काय करिनाने मस्तपैकी पार्टीचा प्लॅन बनवला. करिनाचे जवळचे मित्र-मैत्रिणी जमल्या. अमृता अरोरा, सोनम कपूर, करण जोहर, बहीण करिश्मा कपूर असे सगळेच...मस्तपैकी गप्पा रंगल्या आणि मध्यरात्री नंतर पार्टी...रात्र चढत गेली तरी पार्टीही रंगत गेली..पण??? पण करिनाच्या घरातील या गोंधळामुळे शेजाºयांच्या झोपेचे मात्र खोबरे झाले..नेहमीचेच म्हणून दुर्लक्ष करण्याऐवजी यावेळी शेजाºयांनी थेट पोलिस ठाण्याचा नंबर लावला आणि काही क्षणात पोलिस करिनाच्या दारात उभे झाले..बिच्चाºया करिनाचा नाईलाज झालाच. काही क्षणात तिला पार्टी गुंडाळावी लागली...