करिना म्हणते,‘जब वी मेट’ केमिस्ट्री पुन्हा साकारायचीय’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 10:56 IST
करिना कपूर खान हिला तिचा एक्स बॉयफ्रेंड शाहीद कपूर विषयी विचारण्यात आले तेव्हा ती म्हणते,‘जब वी मेट’ मध्ये आम्ही ...
करिना म्हणते,‘जब वी मेट’ केमिस्ट्री पुन्हा साकारायचीय’
करिना कपूर खान हिला तिचा एक्स बॉयफ्रेंड शाहीद कपूर विषयी विचारण्यात आले तेव्हा ती म्हणते,‘जब वी मेट’ मध्ये आम्ही जी एक केमिस्ट्री प्रेक्षकांसमोर ठेवली होती. तीच आता आम्हाला पुन्हा ‘उडता पंजाब’ मध्ये साकारायची आहे. इम्तियाज अली यांच्या ‘जब वी मेट’ मध्ये करिनाने गीतची भूमिका केली होती. यात शाहीद-करीनाची केमिस्ट्री होती तशीच उडता पंजाबमध्ये साकारायची असल्याचे ती सांगते. करिना-शाहीदचा एकही सीन एकत्र नाही.ती दिलजित दोसंघ सोबत दिसणार आहे. तर शाहीदसोबत आलिया भट्ट दिसणार आहे. करीना आणि दिलजीतला आॅनस्क्रीन पाहण्याशिवाय आता प्रेक्षकांनाही थांबता येणार नाही. अभिषेक चौबे दिग्दर्शित आगामी ‘उडता पंजाब’ चित्रपट हा या वर्षातील सर्वांत उत्सुकता असणाºया चित्रपटांपैकी एक आहे.१७ जून रोजी रिलीज होणार आहे.