या अटीवर करिनाने केले सैफशी लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 08:22 IST
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर हिने एका अटीवर सैफ अली खानशी लग्न केले होते. आजपर्यंत कधीही करिनाने ही अट ...
या अटीवर करिनाने केले सैफशी लग्न
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर हिने एका अटीवर सैफ अली खानशी लग्न केले होते. आजपर्यंत कधीही करिनाने ही अट कोणती, हे सांगितले नाही. मात्र ‘की अॅण्ड का’ या तिच्या आगामी चित्रपटाच्याच्या प्रमोशनदरम्यान तिने याचा खुलासा केला. या चित्रपटात करिना एका कामकाजी महिलेची भूमिका साकार आहेत. ती पैसे कमावते आणि तिचा पती घर सांभाळतो, अशी ही कथा आहे. या पार्श्वभूमीवर करिनाने अनेक गुपिते उघड केली. मी एकटी होते तेव्हापासून काम करते आहे. आता लग्न झाले आहेयं. आता मी कुणाची पत्नी आहे, पण तरिही माझे काम सुरू आहे आणि मी स्वत:च्या पायावर उभी आहे. उद्या कदाचित आई होईल, तरिही मी काम करीत राहल. आयुष्य आहे, तोपर्यंत काम करून मला माझे पैसे कमावयचेतं. माझ्या नवºयाचा याला पाठींबा आहे. किंबहुना याच अटीवर मी लग्न केले आहे, असे करिनाने सांगितले.