Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' अभिनेत्याच्या प्रेमात वेडी होऊन घरातून पळून जाणार होती करिना कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 12:05 IST

अभिनेत्री करिना कपूर खान बॉलिवूडमधला टॉप 5च्या अभिनेत्रींपैकी एक आहे. करिनाने आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ...

अभिनेत्री करिना कपूर खान बॉलिवूडमधला टॉप 5च्या अभिनेत्रींपैकी एक आहे. करिनाने आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. करिना कपूर लवकरच वीरे दी वेडिंगमध्ये दिसणार आहे. सध्या करिना कपूरचे स्टायलिश फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतायेत. तुम्हाला करिनाचा जब व्ही मेट चित्रपट तर आठवत असेल ज्यात करिनाचे घरातून पळून जाऊन लग्न करण्याचे स्वप्न असते. आता या पुढचे जे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते नीट ऐका. करिनाचे खऱ्या आयुष्यात ही पळून जाऊन लग्न करण्याचे स्वप्न होते. करिना आणि सैफची लव्ह स्टोरी तर सगळ्यांना माहित आहे. मात्र करिना आणि सैफचे नात तिच्या घरच्यांना मान्य नव्हते. त्यांनी अनेक वेळा यासंदर्भात करिनाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र करिना सैफच्या प्रेमात अखंड बुडाली होती. त्यानंतर तिने घरातून पळून जाण्याचा विचार केला होता. करिनाने घरातल्यांना स्पष्ट शब्दात सांगितले होते की लग्न करेन तर सैफशीच नाहीतर कुणाशीच नाही. जर तुम्ही माझ सैफसोबत करुन दिले नाही तर मी घरातून पळून जाईन. लग्नच्या आधीपासूनच सैफ आणि करिना लिव्ह इनमध्ये राहायला लागले होते. त्यानंतर करिनाच्या हट्टापुढे कोणाचे काही चालले नाही आणि सैफसोबत ती लग्न बेडीत अडकली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये करिनाने तैमूर अली खान या गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सध्या सैफ आणि करिनापेक्षा त्यांचा मुलगा तैमूरचे जास्त चर्चेत असतो.ALSO READ :  करिना कपूरने धोका दिल्यानेच बॉबी देओलचे करिअर झाले उद्ध्वस्त!करिना कपूरचे अफेयर सैफ आधी शाहिद कपूरसोबत होते. मात्र जास्त दिवस या दोघांते नाते टिकू शकले नाही. शाहिदचा मीरा राजपूतसोबत विवाह होऊन त्याला मीशा नावाची मुलगी आहे. दोघे ही आपल्या संसारात सुखी आहेत. शाहिदचा पद्मावती चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यातील त्याचा महारावल रतन सिंहच्या भूमिकेतील लूक लाँच करण्यात आला आहे. यात तो राणी पद्मावतीच्या पतीच्या भूमिकेत दिसणार आहे.