Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऐ लडकी कमर हिला नहीं तो...!  रात्री 1 वाजता सरोज खान करिना कपूरला झापतात तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 11:24 IST

सरोज खान यांच्या निधनानंतर त्यांचे अनेक जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात सरोज व करिना कपूर यांचाही एक व्हिडीओ आहे.

ठळक मुद्देरेफ्युजी या सिनेमाच्या सेटवरचा किस्साही करिनाने ऐकवलाय

बॉलिवूडच्या दिग्गज कोरिओग्राफर सरोज खान यांचे आज निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सरोज यांच्या निधनानंतर त्यांचे अनेक जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात सरोज व करिना कपूर यांचाही एक व्हिडीओ आहे. या थ्रोबॅक व्हिडीओत करिना तिचे करिअर व सरोज खान यांच्याबद्दल बोलतेय.

 ‘जबी वी मेट’ या सिनेमात मी साकारलेली गीतची भूमिका प्रचंड गाजली. ही भूमिका इतकी शानदार अंदाजात पडद्यावर साकारण्याचे श्रेय मास्टरजी (सरोज खान) यांना जाते, असे करिना व्हिडीओत म्हणतेय. ‘दिल मेरा मुफ्त का’ या गाण्याच्या शूटींगदरम्यानचा सरोज खान यांच्यासोबतचा एक किस्साही ती सांगतेय. करिना सांगते, ‘दिल मेरा मुफ्त का या गाण्याच्या किस्सा मला आठवतो.  ऐ लडकी कमर हिला, तभी शॉट ओके होगा, असे मास्टरजी मला रात्री 1 वाजता म्हणाल्या होत्या.  रात्री 1 वाजता मला सरोज खान यांचा फोन आला होता. ऐ लडकी कमर हिला. रात के 1 बज रहे है, क्या कर रही है?,’ असे रागारागात त्या मला म्हणाल्या होत्या.

रेफ्युजी या सिनेमाच्या सेटवरचा किस्साही करिनाने ऐकवलाय. ती म्हणते, ‘मास्टरजींना इम्प्रेस करणे फार कठीण आहे. रेफ्युजीचे शूटींग सुरु होते. मास्टरजी मला डान्स स्टेप्स शिकवत होत्या. अचानक त्या संतापल्या. तुम्हे अपने पैरों और हाथों को अदाओं से हिलाना नहीं आता और तुमने हिरोइन बनने के बारे में कैसे सोच लिया. तुम करिश्मा की बहन हो, असे रागारागात त्यांनी मला सुनावले होते. मला डान्स येत नाही, असे मी सांगितल्यावर हात पाय हलवता येत नाही तर चेह-याने तरी नाच, असे त्यांनी मला सुनावले होते.’

टॅग्स :सरोज खानकरिना कपूर