Join us

करिना कपूर, सैफ अली खानसोबत तैमूर करतोय इंटरनॅशनल ट्रिप एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 11:41 IST

काही दिवसांआधीच करिना कपूर, सैफ अली खान आणि तैमूर अली खान काही दिवसांपूर्वीच मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर दिसले होते. तिघेही ...

काही दिवसांआधीच करिना कपूर, सैफ अली खान आणि तैमूर अली खान काही दिवसांपूर्वीच मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर दिसले होते. तिघेही परदेशात सुट्ट्या एन्जॉय करतायेत. तैमूरची ही पहिलीच इंटरनॅशनल ट्रीप आहे. 7 महिन्यांच्या तैमूरसोबत मम्मी-पप्पा  क्वॉलिटी टाईम स्पेंट करतायेत. पौतोडी फॅमिली स्वित्झर्लंडमध्ये व्हेकेशनवर गेली आहे. तैमूर तिथल्या वातावरणाचा आनंद लुटताना दिसतो आहे. सैफ, करिना आणि तैमूरचा स्वित्झर्लंडमधला एका फोटो व्हायरल झाला आहे. यात तैमूर खूप खूश दिसतो आहे. सैफच्या मांडीवर तैमूर बसला आहे. तर करिना तैमूरच्या बाजूला बसली आहे. हा तिघांचा फॅमिली परफेक्ट पिक्चर आहे. या फोटोत सैफ त्याच्या नवाबी अंदाजात दिसतो आहे तर करिना कपूर खान ही विना मेकअप सुंदर दिसते आहे. तैमूर आपल्या वडिलांच्या मांडीवर बसून खूपच खूश दिसतो आहे. तैमूरची क्यूट स्माईल या फोटोला चार चाँद लावते आहे. ALSO READ : तैमूरला मम्मी करिना कपूरच्या ‘या’ गोष्टीची येते प्रचंड चीड!!या आधी  तैमूर आणि सैफचा हा फोटोसमोर आला होता यात तैमूर सैफच्या कडेवर होता. यात सैफ आपल्या लाडक्या मुलाच्या डोक्यावर किस्स घेताना दिसतो आहे. हा फोटो बाप-लेकामधल्या नात्याबाबत बरेच काही सांगून जातो आहे. तैमूरच्या जन्मानंतर करिना आणि सैफ हे कुठेच बाहेर गेले नव्हते. त्यामुळे 2 आठवड्यासाठी सैफ, करिना आणि तैमूरचा मुक्काम स्वित्झर्लंडमध्ये असणार आहे. व्हेकेशनवरुन परतल्यानंतर करिना वीरे दी वेडिंगच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर करतेय तर करिनासह यात सोनम कपूर आणि स्वरा भास्कर ही झळकणार आहे. सैफ अली खानचे  कालाकांडी आणि सेफ हे चित्रपट रिलीज होणार आहेत.