Join us

पहिल्यासारखीच स्लीम दिसत आहे करिना कपूर; १३ किलो वजन केले कमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 22:17 IST

आपल्या फिगरबाबत नेहमीच सजग असलेली बेबो करिना कपूर प्रेग्नेंसीदरम्यान वाढलेल्या वजनामुळे चर्चेत होती. अर्थातच ही चर्चा नकारात्मक असल्याने करिनाला ...

आपल्या फिगरबाबत नेहमीच सजग असलेली बेबो करिना कपूर प्रेग्नेंसीदरम्यान वाढलेल्या वजनामुळे चर्चेत होती. अर्थातच ही चर्चा नकारात्मक असल्याने करिनाला वाढते वजन असह्य झाले होते. त्यामुळे वजन कमी करण्याचा जणू काही तिला ध्यासच लागला होता. त्यात ती यशस्वी झाली असून, तब्बल १३ किलो वजन कमी केल्याने बेबो सुरुवातीसारखीच स्लीम दिसत आहे. आता ही बातमी तिच्या चाहत्यांसाठी सुखद ठरेल यात दुमत नाही. प्रेग्नेंसीदरम्यान करिनाचे तब्बल १८ किलो वजन वाढले होते. तैमूरसारख्या गोंडस मुलाला जन्म देणाºया करिनाचे जेवढे कौतुक झाले तेवढाच तिला वाढत्या वजनामुळे टीकेचाही सामना करावा लागला. त्यामुळे तिने वजन कमी करण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करण्यास सुरुवात केली. फिटनेस आणि फॅशनची रोल मॉडेल असलेल्या करिनाने एवढ्या लवकर वजन कमी कसे केले? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. वजन कमी करण्यासाठी करिनाने नेमके काय फंडे वापरले हे जाणून घेण्यासाठी तिचे फॅन्स उत्सुक आहेत. आज करिनाच्या याच सीक्रेटचा आम्ही उलगडा करणार आहोत. वास्तविक करिनाने डायटीशियन रुजुता दिवेकर हिचा डायट चार्ट फॉलो केला. रुजुता दिवेकर जेवढे खाण्यास सांगत होती तेवढेच पदार्थ करिना खात असे. एका मुलाखतीत करिनाने सांगितले होते की, मी माझे वजन कमी करण्यास अजिबात घाई करणार नाही. मी तेच फॉलो करत आहे, जे मला सांगितले जात आहे. अचानकपणे कमी झालेले माझे वजन काही चमत्कार नाही, तर त्यासाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागल्याचे करिनाने सांगितले. पुढे बोलताना करिनाने म्हटले होते की, सध्या मला एकच ध्यास आहे, तो म्हणजे प्रेग्नेंसीदरम्यान वाढलेले सर्व वजन कमी करणे. मला स्लीम आणि एनर्जीने भरपूर असलेले शरीर हवे आहे. त्यासाठी मी मेहनत घेत आहे. करिनाने जेव्हा बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती तेव्हा तिच्या फिगरविषयी सर्वदूर बोलले जात होते. काही अभिनेत्रींसाठी तर करिना रोल मॉडेल होती. आता करिना पुन्हा तिच्या स्लीम अवतारात परतत असल्याने तिच्या फॅन्समध्ये आनंदाचे वातावरण नसेल तरच नवल.