एका फोटोमध्ये करिनाने लॉन्ग गोल्डन शिमरी मॅक्सी घातलेली आहे. दुसºया फोटोत तिने निळ्या रंगाचा शिमरी गाउन घातला आहे, तर तिसºया फोटोमध्ये करिना व्हाइट लेस गोल्डन ड्रेसमध्ये दिसत आहे. करिनाचे हे सर्व फोटो वोगने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. करिना सध्या तिच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात करिना व्यतिरिक्त सोनम कपूर, स्वरा भास्कर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. करिना आई झाल्यामुळे या चित्रपटाचे शूटिंग बराच काळ थांबले होते. आता करिना आई बनल्यानंतर या चित्रपटातून दमदार कमबॅक करण्यास सज्ज आहे.
काहीकाळापूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. पहिल्या पोस्टरमध्ये करिनाने तिचा चेहरा एका हातपंख्याच्या साहाय्याने झाकलेला दिसत आहे. स्वरा जमिनीवर पडलेली कुठलीतरी वस्तू उचलत असल्याने तिचा चेहरा झाकला गेला आहे, तर शिखा सोनमचा पदर काळजीपूर्वक बघताना दिसत आहे. दुसºया पोस्टरमध्ये सोनम आणि करिना मस्तीच्या मुडमध्ये दिसत आहेत. एकूणच आतापर्यंत रिलीज करण्यात आलेल्या सर्व पोस्टर्सला चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.