Join us

विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 10:58 IST

वयाच्या ४४ व्या वर्षी दुपटीने कमी वयाच्या हिरोसोबत करीना करणार रोमान्स

अभिनेत्री करीना कपूरने (Kareena Kapoor)  तिच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक दमदार सिनेमे दिले आहेत. कधी चुलबुली तर कधी गंभीर भूमिकांमध्येही तिला आपण पाहिलं आहे. करीनाचा मोठा चाहतावर्ग आहे. दोन मुलांच्या जन्मानंतरही तिचं करिअर थांबलेलं नाही. उलट तिला वेगवेगळ्या भूमिका ऑफर होत आहेत. करीना आगामी सिनेमात भूत बनणार असून एका विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. करीना कपूर सध्या ४४ वर्षांची आहे. 'ब्रह्मास्त्र' सिनेमाचे सह लेखक हुसैन दलाल यांच्या आगामी सिनेमात करीना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे ही भूताची भूमिका आहे. तर तिच्यासोबत विशीतला अभिनेता रोमान्स करणार आहे. हॉरर वर्ल्ड मध्ये ही भूताची कहाणी थोडी रिफ्रेशिंग आणि युनिक असणार आहे. या भूमिकेसाठी करीनाच योग्य असल्याचं त्यांचं मत आहे. अद्याप सिनेमाच्या कास्ट संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र आजपर्यंत अभिनेत्यांनीच कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत रोमान्स केल्याचं अनेकदा आपण पाहिलं आहे. आता करीना कोणासोबत दिसणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.

हुसैन दलाल यांनी अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र पार्ट १'चे संवाद लिहिले होते. तसंच त्यांनी 'मार्गारेट विथ द स्ट्रॉ', '२ स्टेट्स', 'ये जवानी है दिवानी', 'शेमलेस' अशा अनेक सिनेमांसाठी काम केलं आहे. 

करीना कपूरने २०१६ साली आलेल्या 'की अँड का' सिनेमात अर्जुन कपूरसोबत रोमान्स केला होता. करीना अर्जुनपेक्षा ४ वर्षांनी मोठी आहे. दोघांनी सिनेमात किसींग सीन्सही दिले होते. त्यांच्या सिनेमाची खूप चर्चा झाली होती. तसंच सिनेमाचा विषयही अनेकांना भावला होता. करीना लवकरच मेघना गुलजारच्या आगामी 'दायरा' सिनेमातही दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन आहे.

टॅग्स :करिना कपूरबॉलिवूड