तैमूरनंतर करिना कपूरला दुसरे बाळ नको?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2017 13:31 IST
करिना कपूर काही महिन्यांपूर्वीच आई झाली. तिच्यासाठी तिचा मुलगा तैमूर अली खान म्हणजे जीव की प्राण. तैमूर म्हणजे करिनाचे ...
तैमूरनंतर करिना कपूरला दुसरे बाळ नको?
करिना कपूर काही महिन्यांपूर्वीच आई झाली. तिच्यासाठी तिचा मुलगा तैमूर अली खान म्हणजे जीव की प्राण. तैमूर म्हणजे करिनाचे अख्खे जग. आता तर तिच्या इतकाच तिचा हा लाडका मुलगा सुद्धा स्टार झालाय. करिनाइतकीच तैमूरच्याही चाहत्यांची कमतरता नाही. कधी लाडका तैमूर, बाल्कनीत झोपाळ्यावर पहुडलेला दिसतो, कधी आई करिनासोबत कारमधून फिरताना दिसतो. करिना स्वत:ही तैमूरची प्रशंसा करताना थकत नाही. अलीकडे करिना एका इव्हेंटमध्ये तैमूरबदद्ल भरभरून बोलली. सेलिब्रिटी आपल्या मुलांना मीडियापासून लपवतात. पण तुझा असा प्रयत्न नसतो, असे का? असा प्रश्न करिनाला यावेळी विचारला गेला. यावर करिनाने काय उत्तर दिले माहितीय? आता काळ बदलल्याचे ती म्हणाली. काळ बराच बदललाय. आम्ही कुठेही असोत, मीडिया क्लिक करणारच. तैमूरने एक नॉर्मल आयुष्य जगावे, असे त्याची आई म्हणून मला वाटते. मग त्याला वेगळी ट्रिटमेंट का दिली जावी? मी आणि सैफ नॉर्मल आयुष्य जगतो आहोत. आमच्याप्रमाणे त्याने सुद्धा नॉर्मल आयुष्य जगावे, असे माझे मत आहे. माझ्या मुलाचे फोटो काढण्यासाठी मीडियाची रांग लागत असेल, तर मला त्यात काहीही अडचण नाही. तो तसाही सुंदर आहे, असे ती म्हणाली होती.तैमूरनंतर तू दुसरे बाळ प्लान करते आहेस का? असा आणखी एक प्रश्नही करिनाला विचारला गेला. यावर करिनाचे उत्तर बरेच डिप्लोमॅटिक होते. तैमूरच्यावेळी पे्रग्नेंट असताना सगळ्यांनीच मला सहकार्य केले. माझी मदत केली. तूर्तास तरी मला पुन्हा त्या सगळ्यांतून जाण्याची इच्छा नाही, असे ती म्हणाली. आता करिनाला तैमूरनंतर दुसरे बाळ नको, असा याचा अर्थ काढायचा की आणखी काही, हे तुम्हीच ठरवा.