Join us

​ करिना कपूरने या कारणामुळे नाकारला शाहरूख खानचा चित्रपट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2017 11:47 IST

आनंद एल रायचा आगामी चित्रपट कायम चर्चेत आहे. या चित्रपटात शाहरूख खान मुख्य भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या ...

आनंद एल रायचा आगामी चित्रपट कायम चर्चेत आहे. या चित्रपटात शाहरूख खान मुख्य भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या सेटवरचे शाहरूखचे काही फोटो व्हायरल झाले होते. गेल्या काही महिन्यांत या चित्रपटासाठी अनेक अभिनेत्रींच्या नावांची चर्चा झाली. यानंतर कुठे अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ या दोघींची नावे यासाठी फायनल झालीत. पण खरे तर या चित्रपटासाठी आनंद एल राय यांची पहिली पसंत कुणी दुसरीच अभिनेत्री होते. होय, या चित्रपटातील फिमेल लीड रोल सर्वप्रथम याच अभिनेत्रीला आॅफर केला गेला होता. ही अभिनेत्री होती, करिना कपूर खान.आनंद एल राय यांना आपल्या या चित्रपटात करिना हवी होती. त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम तिलाच गळ घातली होती. पण करिनाने या चित्रपटासाठी नम्र नकार दिला. आता करिनाच्या या नकारामागचे कारण काय ? शेवटी तिने हा चित्रपट हातचा का घालवावा? तर यामागचे पहिले कारण आहे तारखा. होय, या चित्रपटाच्या तारखा करिनाच्या ‘वीरे दी वेडिंग’सोबत क्लॅश होत होत्या. करिनाने आपल्या तारखा आधीच ‘वीरे दी वेडिंग’साठी दिल्या होत्या. त्यामुळे करिनाने या चित्रपटाला नकार दिला. आणखी एक कारण म्हणजे, तैमूरच्या जन्मानंतर करिनाला लगेच शूटींग सुरु करायचे नव्हते. त्याआधी तिला वाढलेले वजन  कमी करायचे होते. ALSO READ : लाडका तैमूर कुणासारखा दिसतो? यावरून भांडताहेत सैफ अन् करिना!करिनाने नाही म्हटल्यानंतर आनंद एल राय यांचा नाईलाज झाला व त्यांनी अनुष्काला हा रोल आॅफर केला.  सध्या करिना कपूर जिममध्ये घाम गाळतेय. लवकरच ती ‘वीरे दी वेडिंग’चे शूटींग सुरु करणार आहे. यात सोनम कपूर व स्वरा भास्कर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.