Join us

करीनाला सेटवर मिळणार स्पेशल ट्रीटमेंट...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 17:13 IST

 करीना कपूर खान ही आता आई होणार आहे. डिसेंबरमध्ये सैफिनाला त्यांचे बाळ मिळणार आहे. तिचा तिसरा महिना संपून आता ...

 करीना कपूर खान ही आता आई होणार आहे. डिसेंबरमध्ये सैफिनाला त्यांचे बाळ मिळणार आहे. तिचा तिसरा महिना संपून आता चौथा महिना लागणार आहे. आगामी चित्रपट ‘वीरें दी वेडिंग’ च्या सेटवर तिला आता खुपच स्पेशल ट्रीटमेंट मिळेल अशी शाश्वती निर्माती रिहा कपूर आणि दिग्दर्शक शशांक घोष यांनी दिली आहे.रिहा आणि शशांक हे दोघे हरयाणातील पतौडी पॅलेस येथे तिला भेटण्यासाठी गेले होते. चित्रपटाचे शेड्यूल त्यांनी शूटींगसाठी ठरवून घेतले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार,‘ करिना ही आता या चित्रपटाची शूटींग करायला तयार आहे.तिला शूटींग करताना बिल्कुल बोअर होणार नाही याची जबाबदारी दिग्दर्शक-निर्माते यांनी घेतली आहे. आॅगस्टमध्ये बँकॉक तर दिल्लीत पुढील शुटींग होणार असल्याचे कळते आहे.’