Join us  

करणजित कौर ते सनी लिओनी... माहीत नसलेली खरी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 5:13 PM

सनी लिओनी. एक वादळी अन् धाडसी अभिनेत्री. तिच्या झंझावाती प्रवासावर, १८० डिग्रीतील जीवनपटावर आतापर्यंत अनेकांनी लिहिलंय. तिचा बोल्डनेस हा कायमच चर्चेचा विषय राहिलाय.

हा लेख ZEE5 ने प्रायोजित केला आहे.

सनी लिओनी. एक वादळी अन् धाडसी अभिनेत्री. तिच्या झंझावाती प्रवासावर, १८० डिग्रीतील जीवनपटावर आतापर्यंत अनेकांनी लिहिलंय. तिचा बोल्डनेस हा कायमच चर्चेचा विषय राहिलाय. तिचा भूतकाळ आणि वर्तमान यात जमीन-अस्मानाचं अंतर आहे आणि कदाचित त्याचमुळे तिच्याबद्दलच सगळ्यांच्याच मनात एक वेगळीच उत्सुकता आहे. ती ओळखूनच, दिग्दर्शक आदित्य भट्ट घेऊन आलेत, ZEE5 वर 'करणजित कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी' ही वेबसीरिज. सनी लिओनीचा बालपणापासूनचा प्रवास दाखवणारी ही वेबसीरिज ZEE5 या अॅपवर प्रदर्शित करण्यात आली आहे. 

सनीसाठी फॅमिली फर्स्ट!

करणजित कौर वोहराला सर्वजण सनी लिओनी म्हणून ओळखतात. पण,  सनीमध्ये दडलेली करणजित कौर या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळते. कुटुंबाला महत्त्व देणाऱ्या प्रामाणिक मुलीला आपल्या आयुष्यातील निर्णय कसे घ्यायचे हे माहीत आहे. त्यासोबतच, पूर्वायुष्यात जे काही घडलं, त्याबद्दल तिला अपराधी वाटत नसल्याचंही पहिल्याच भागातून समोर येतं. या कथेमध्ये सनीचा १९९४ ते २०१६ दरम्यानचा प्रवास मांडण्यात आलाय. कॅनडा ते लॉस एंजेलिस आणि न्यूयॉर्क ते मुंबई असा प्रवास तिने केलाय. न्यूज रूममध्ये पत्रकाराच्या तिखट प्रश्नांना उत्तरं देत सनीने आपला भूतकाळ उलगडला आहे.  

खिळवून ठेवणारा अभिनय

सनीच्या आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे तिचं परदेशातील बालपण. रायसा सोजानी हिने तरुणपणीची सनी साकारली आहे. रायसाच्या अफलातून अदाकारीने पहिल्या एपिसोडची दणक्यात सुरुवात झाली असे म्हणायला हरकत नाही. लहान असताना आर्थिक अडचणीमुळे सनीला वर्तमानपत्र विकण्यापासून ते घरं रंगवण्याचं काम करावं लागलं होतं, हे यात दाखवण्यात आलं आहे. 

सनी लिओनी या नावाने सर्वांना माहीत असलेल्या करणजितचं सनी नाव हे तिच्या लहान भावाने तिला दिलं. खरंतर तिच्या लहान भावाचं नाव सनी आहे. वेबसीरिजमध्ये तिच्या लहान भावाची भूमिका करणवीर लाम्बा याने साकारली आहे. सनीचा भाऊ हा बहिणीची फार काळजी करणारा, तिला पाठिंबा देणारा आहे. करणजितच्या आई-वडिलांची भूमिका करणारे विजय आनंद आणि ग्रुषा कपूर यांनीही त्यांच्या भूमिकांना न्याय दिलाय. 

इमोशनल सुरुवात, आनंदी शेवटही कथा पूर्णपणे एक 'इमोशनल राईड' आहे. यात भाऊ-बहीण आणि आई-वडिलांच्या प्रेमासोबतच एका भारतीय आईच्या भावनाही आहेत. आपली मुलगी पॉर्न इंडस्ट्रीचा भाग आहे, हे पचवणं आईसाठी अत्यंत कठीण गोष्ट होती. शीख समाज आणि घरच्यांच्या बोलण्यामुळे ती नाराज झाली होती. पण नंतर सगळं ठीक होतं. करणजित १३ वर्षांची असताना तिला एक ड्रेस खरेदी करण्यासाठी लोकांच्या गार्डनमध्ये रंगकाम करावं लागलं होतं, रस्त्यावर लिंबूपाणी विकावं लागलं होतं, लोकांच्या पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी लागली होती. त्यावेळी, कुठलंही काम लहान नसतं, असा उपदेश लोकांनी तिला केल्याचा एक सीन मालिकेत आहे. त्यातून सनीला लोकांच्या दुटप्पीपणावर बोट ठेवायचं आहे. सनीला पैसे कमवायचे होते आणि त्यासाठी जो मार्ग दिसला त्यावरून ती चालत राहिली. आज ती बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये आहे. 

पॉर्न इंडस्ट्री असो वा बॉलिवूड; जे काही सनीने केलं ते तिने तिच्या मनाने केलं. त्याचा पश्चाताप करणं तिला चुकीचं वाटतं. प्रत्येकाला आपल्या मर्जीने आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे, दुसऱ्या व्यक्तीला चूक किंवा बरोबर ठरवण्याचा अधिकार कुणालाच नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्न ही वेबसीरिज करते.

ZEE5 चॅनलला फॉलो करा Facebook.com/ZEE5Twitter.com/ZEE5IndiaInstagram.com/ZEE5

अॅप डाउनलोड करण्यासाठी खास ऑफर : एका वर्षासाठी भरा आणि दरमहा फक्त ४२ रुपये खर्च करा; ऑफर ३१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत लागू.

https://www.zee5.com/zee5originals/details/karenjit-kaur/0-6-tvshow_984782182/karenjit-kaur-the-untold-story-of-sunny-leone-trailer/0-1-tvshow_984782182-season_1914050019-episode_822830491

टॅग्स :सनी लिओनीकरनजीत कौर सिनेमाबॉलिवूड