Join us

​करण म्हणतो, चित्रपटात यशस्वी तर प्रेमात फ्लॉप ठरलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 15:56 IST

 माझे चित्रपट बॉक्स आॅफिसवर १०० टक्के यशस्वी ठरलेतं. मात्र माझे प्रेम १०० टक्के अपयशी राहिले, हे शब्द आहेत दिग्दर्शक ...

 माझे चित्रपट बॉक्स आॅफिसवर १०० टक्के यशस्वी ठरलेतं. मात्र माझे प्रेम १०० टक्के अपयशी राहिले, हे शब्द आहेत दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर याचे. माझ्या प्रेमाच्या बदल्यात मला नि:स्वार्थ प्रेम देऊ शकेल, अशी कुणीच व्यक्ती मला भेटली नाही, असे करण म्हणाला. रोमाँटिक चित्रपटाद्वारे करणने बॉलिवूडमध्ये  स्वत:ची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्याच्या बहुतेक सर्वच चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर बक्कळ कमाई केली आहे. आपल्या चित्रपटातून अनेक संवेदनशील प्रेमकथा मांडणारा करण स्वत: मात्र प्रेमात अपयशी ठरला आहे. अलीकडे एका मुलाखतीत करण जोहर म्हणाला, माझ्या चित्रपटांनस १०० टक्के यश मिळाले. मात्र प्रेमात मी १०० टक्के फ्लॉप ठरलो. मला भरभरून प्रेम देणारी व्यक्ती भेटलीच नाही. माझ्या प्रेमाच्या मोबदल्यात माझ्यावर नि:स्वार्थ प्रेम करणाºया व्यक्तीचा मला अद्यापही शोध आहे. रिलेशनशिपमध्ये कायम माझ्या आत्मसन्मानाची परिक्षा घेतली गेली. एकीकडे मी हिट प्रेमकथा दिल्यात. दुसरीकडे मला रिलेशनशीपमध्ये फ्लॉप व्हावे लागते. असे तीनदा झाले. अर्थात या सर्व रिलेशनशिप नव्हत्या तर केवळ एकतर्फी प्रेम होते. मी प्रेमात अपयशी ठरलो,याचे मला दु:ख आहे.आयुष्यातील एकाकीपणाबद्दल करण म्हणाला, हे माझ्यावर असलेले प्रेशर आहे. मी ४४ वर्षांचा आहे आणि अजूनही एकटा आहे. आयुष्याचा बराचसा काळ मी एकाकी राहून घालवला आहे, पण मला यावर कोणतेही स्पष्टीकरण द्यायचे नाही. कारण मी एकटा आहे.  मी प्रेम शोधण्याचा पूर्ण प्रयत्न केला. तू आज इतका मोठा आहेस की तुला सहज प्रेम मिळेल, असे लोक मला म्हणतात. पण ते माझ्याबद्दल नाही तर माझ्या पोझिशनबद्दल बोलत असतात.