Join us
Daily Top 2Weekly Top 5

​बिपाशाच्या फोटोत करण ‘मिसिंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 18:55 IST

मिसेस ग्रोवर बनलेली बिपाशा बसूने लग्नानंतरचे अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. पण या सर्व छायाचित्रांमधून तिचा पती करणसिंह ग्रोवर गायब आहे.का?

मिसेस ग्रोवर बनलेली बिपाशा बसू ही लग्नानंतरही सोशल मीडियावर आधी इतकीच अ‍ॅक्टिव्ह आहे. लग्नानंतरचे अनेक छायाचित्रे तिने सोशल मीडियावर शेअर केली आहेत. पण या सर्व छायाचित्रांमधून तिचा पती करणसिंह ग्रोवर गायब आहे. यापूर्वीच्या तिच्या प्रत्येक फोटोत करण असायचा. मग लग्नानंतर बिपाशा एकटीच का? पण आपल्याला जास्त विचार करायची गरज नाहीयं. कारण खुद्द बिपाशानेच या प्रश्नाचे उत्तर दिलेयं. बिपाशाने इन्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून त्याखाली या प्रश्नाचे उत्तरही दिले आहे. असे तिने लिहिलेय. म्हणजेच मॅडम बिपाशाने पतीच्या हाती कॅमेरा सोपवला आहे. म्हणजे करण बिपाशाचे फोटो घेतोय आणि बिपाशा चिल्ड करतेय...म्हणूनच बिपाशाच्या फोटोत करण कुठेही नाही...व्वा बिपाशा, मान गये तुम्हे!!