Join us

​करण जोहरची जुळी मुले यश व रूहीचा हा फोटो तुम्ही बघायलाच हवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 11:44 IST

करण जोहर जुळ्या मुलांचा बाबा झाला आणि बाबा झाल्याचा आनंद त्याने चाहत्यांसोबत शेअरही केला. काही दिवसांपूर्वीच करणने आपल्या जुळ्या मुलांचा पहिला फोटो शेअर केला होता. त्यानंतर काल मंगळवारी करणने यश, रुही या चिमुकल्यांचा आणखी एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोत यश व रूही यांचा हसरा अंदाज बघण्यासारखा आहे.

करण जोहर जुळ्या मुलांचा बाबा झाला आणि बाबा झाल्याचा आनंद त्याने चाहत्यांसोबत शेअरही केला.  काही दिवसांपूर्वीच करणने आपल्या जुळ्या मुलांचा पहिला फोटो शेअर केला होता. त्यानंतर काल मंगळवारी करणने यश, रुही या चिमुकल्यांचा आणखी एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोत यश व रूही यांचा हसरा अंदाज बघण्यासारखा आहे. याच वर्षी करणने सरोगसीद्वारे त्याच्या जुळ्या मुलांना जन्म दिला.   सोशल मीडियावरून जुळ्या मुलांचा बाप झाल्याचे करणने जाहीर केले होते. मी एक चांगला बाप बनण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार.   माझ्या आयुष्यात रूही आणि यश या जुळ्या गोंडस मुलांना प्रवेश केला आहे.  वयाच्या ४४ वर्षी मेडिकल सायन्सच्या मदतीने मी बाप बनू शकलो. हे माझे सगळ्यांत मोठे ब्लॉकबस्टर आहे. सध्या सतत मी त्यांना न्याहाळत बसतो. मी दोन मुलांचा बाप झालोय, यावर माझा स्वत:चाच विश्वास बसत नाही. या दोन चिमुकल्या जीवांनी माझ्या आयुष्यातील एकटेपणा दूर केला, अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या होत्या.करणची जुळी मुले वेळेआधी जन्मल्यामुळे सुमारे एक महिना त्यांना नीओनेटल इंटेन्सिव्ह केअरमध्ये ठेवण्यात आले होते.करणने याची माहितीही चाहत्यांशी शेअर केली होती. माझ्या मुलांचा जन्म दोन महिने आधीच झाल्याने त्यांचे वजन फारच कमी होते. कोणत्याही वडिलांप्रमाणे साहजिकच मलाही माझ्या मुलांची काळजी होती. मी खूप चिंताग्रस्त होतो. त्यावेळी मला त्यांना जवळ घेऊन त्यांचे रक्षण करायचे होते. पण त्यांना तेव्हा एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांना बघून माझ्या काळजाचे पाणी पाणी होत होते, असे तो म्हणाला होता.