Join us

​पटत नाही तर बॉलिवूड सोड...करण जोहरने घेतला कंगना राणौतचा बदला!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 17:27 IST

करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये अलीकडे कंगना राणौत आली होती. या शोमध्ये कंगना हसत हसत करणबद्दल बरेच ...

करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये अलीकडे कंगना राणौत आली होती. या शोमध्ये कंगना हसत हसत करणबद्दल बरेच काही बोलून गेली होती. पण स्वत:च्या शोवर करण काही बोलू शकला नव्हता. पण कंगनाने मारलेल्या टोमण्याला उत्तर तर द्यायचेच होते ना? करणला ही संधी मिळाली ती थेट लंडनमधल्या एका इव्हेंटमध्ये. या इव्हेंटमध्ये करणला कंगना राणौतबद्दल विचारले गेले. ही संधी करण कसा सोडणार होता? त्यानेही कंगनाचा वचपा काढलाच.   कंगनाच्या वूमन आणि व्हिक्टिम कार्डने मी परेशान झालोय. जेव्हा केव्हा संधी मिळेल, तेव्हा तुम्ही स्वत:ला एखाद्या पीडित व्यक्तीसारखे सादर करू शकत नाही.जणू काही बॉलिवूडमध्ये तुमच्यावर प्रचंड अत्याचार होत आहेत. बॉलिवूड इतके वाईट असेल तर सोडून द्यावे, असे करण एका दमात बोलून गेला. करणच्या या वाक्यांना प्रचंड टाळ्या पडल्या. तू बाहेरून बॉलिवूडमध्ये आलेल्या व्यक्तिंप्रती दुजाभाव ठेवतो का? असा प्रश्नही करणला विचारण्यात आला. यावर करणने नकारार्थी उत्तर दिले. असे अजिबात नाही. स्वत:ची गोष्ट प्रभावीपणे सांगण्यासाठी कंगना वाढवून चढवून बोलली. पण ती बोलली ते तिच्यासाठी आणि माझ्या शोसाठीही मनोरंजक होते, असे तो म्हणाला.काही आठवड्यांपूर्वी कंगना राणौत ‘रंगून’च्या प्रमोशनसाठी सैफ अली खानसोबत करण जोहरच्या शोवर गेली होती. या शोदरम्यान कंगनाने करणला बरेच काही सुनावले होते. मी जर बायोपिक बनवले तर तू त्यात एका स्टीरिओटिपिकल माणसाची भूमिका साकारशील. जो अतिशय घमंडी आणि बाहेरच्या लोकांप्रती दुजाभाव ठेवणारा असेल. आपण त्या व्यक्तिला ‘मुव्ही माफिया’ म्हणू शकतो, असे कंगना करणला उद्देशून म्हणाली होती. कंगनाचा हा वार करणच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.