Join us  

Karan Johar : "आयुष्यात सकारात्मक ऊर्जा हवी आणि त्या दिशेने हे... "; करण जोहरचा ट्विटरला 'रामराम'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 3:30 PM

Karan Johar : करण जोहरचे कपडे असो किंवा त्याने केलेले वक्तव्य किंवा नेपोटिझममुळे करणला नेहमीच ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

दिग्दर्शक करण जोहर आणि ट्रोलिंग हे जणू समीकरणच बनले आहे. मग करण जोहरचे कपडे असो किंवा त्याने केलेले वक्तव्य किंवा नेपोटिझममुळे करणला नेहमीच ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. आता मात्र या ट्रोलिंगला कंटाळूनच की काय करण जोहरने ट्विटरला गुडबाय म्हणले आहे. आयुष्यात सकारात्मक ऊर्जा हवी आणि त्या दिशेने हे पहिले पाऊल असं म्हणत त्याने ट्विटरला गुड बाय केले आहे. 

करण जोहरला मात्र यावरून ही पुन्हा नेटिझन्सने ट्रोलच केलं आहे. ब्रह्मास्त्र सिनेमाच्या पार्ट 2 कडे लक्ष दे असं एका नेटिझनने कमेंट केली. त्यामुळे इथेही ट्रोलर्सने करण जोहरची पाठ सोडलेली नाही असेच दिसून येते. 

नुकताच करण जोहर चा 'कॉफी विथ करण' च्या सिझन 7 चा शेवटचा भाग प्रसारित झाला. या सिझनमध्ये करणने मान्य केले की त्याला या ट्रोलिंगची आता सवय झाली आहे. तरी करण जोहरने आज ट्विटरला कायमचा रामराम केल्याने त्याचे चाहते मात्र निराश झाले असणार हे नक्की. 

टॅग्स :करण जोहरट्विटर