Join us

...अखेर लग्नाविषयी करण जोहरने केला मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 21:37 IST

गेल्या काही महिन्यांपासून निर्माता करण जोहर कुठल्या ना कुठल्या कारणाने वादाच्या भोवºयात अडकत आहे. कॉन्ट्रोर्व्हसी आणि करण जोहर हे ...

गेल्या काही महिन्यांपासून निर्माता करण जोहर कुठल्या ना कुठल्या कारणाने वादाच्या भोवºयात अडकत आहे. कॉन्ट्रोर्व्हसी आणि करण जोहर हे जणूकाही नातेच झाले आहे. काही दिवसांपूर्वीच सरोगसी पद्धतीने तो जुळ्या मुलांचा बाप बनल्याचे समोर आले होते. मात्र यामुळे त्याने अद्यापपर्यंत लग्न का केले नाही? असा प्रश्नही उपस्थित केला. आता प्रश्नाचा उलगडा करताना करणने मोठा खुलासा केला आहे. नुकत्याच झालेल्या इंडिया टुडे कॉन्क्लेवमध्ये करण सहभागी झाला होता. यावेळी त्याला त्याच्या लव्ह लाइफविषयी विचारण्यात आले. करणनेदेखील दिलखुलासपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. तो म्हणाला की, ‘माझे सर्व सिनेमे तुम्हाला एखाद्या ड्रामापेक्षा कमी वाटत नाहीत. कारण मी त्याच सिनेमांची निर्मिती करतो, ज्याची कथा मी माझ्या आयुष्यात अनुभवली आहे. लव्ह लाइफविषयी बोलायचे झाल्यास, मी जिच्यावर प्रेम करत होतो, तिच्या लग्नमंडपात मी उपस्थित होतो. काही दिवसांपूर्वीच करणने म्हटले होते की, जो लग्नाच्या बंधनात अडकतो तो पूर्णत: फसतो. त्यामुळे मला लग्न करून फसायचे नाही. काही दिवसांपूर्वीच करण जुळ्या मुलांचा बाप बनल्याचे समोर आले. त्याने सरोगसीचा निर्णय यासाठी घेतला होता की, म्हातारपणात त्याला कोणीतरी हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे. जेव्हा करण बाप बनल्याची बातमी समोर आली तेव्हा बॉलिवूडकरांनी त्याचे अभिनंदन केले. मात्र याचवेळी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमीने त्याच्या लग्नाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तेव्हापासून करणच्या लग्नाबाबत सगळ्यांनाच उत्सुकता निर्माण झाली होती. आता यावरदेखील करणने खुलासा करून या चर्चांना काहीसा पूर्णविराम दिला आहे.