करण जोहरने या करणामुळे पसंत होळी..कारण आहे अभिषेक बच्चन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 13:24 IST
भारतात होळी या सणांची वाट लहानांनपासून ते मोठ्यापर्यंत सगळेच करत असतात. सेलिब्रेटीही यात मागे नसतात. चार दिवस आधीपासूनच होळीच्या ...
करण जोहरने या करणामुळे पसंत होळी..कारण आहे अभिषेक बच्चन
भारतात होळी या सणांची वाट लहानांनपासून ते मोठ्यापर्यंत सगळेच करत असतात. सेलिब्रेटीही यात मागे नसतात. चार दिवस आधीपासूनच होळीच्या तयारीला सुरुवात करण्यात येते. मात्र होळीच्या रंगापासून लांब पळणारे काही अपवादात्मक लोक सुद्धा आहेत. या यादीत बॉलिवूडचा दिग्दर्शक करण जोहरचे नावदेखील सामिल आहे. एक टीव्ही शोच्या कार्यक्रमात करणने हा खुलासा केला आहे की त्याला होळीचे रंग खेळणं अजिबात आवडत नाही. इंडियाज नेक्स सुपरस्टार्स या कार्यक्रमाच्या होळी विशेष भागाच्या शूटिंग दरम्यान करणने याचा खुलासा केला. करण म्हणाला, जेव्हा मी सहा ते सात वर्षांचा होता त्यावेळी माझ्या सोसायटीतील मुलं माझा अंगावर सिल्वर रंग टाकायला मागे लागले होते. मी त्यावेळी स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात पडलो आणि मला दुखापत झाली. त्यानंतर त्या मुलांशी माझं भांडणं झाले. एक दुसरा किस्सा जो अमिताभ बच्चन यांच्या घरी घडला होता. करणने सांगितले की, मला नीट आठवतेय की मी 10 वर्षांचा असताना अमिताभ बच्चन यांच्या घरी होळी खेळायला गेला होता. त्यावेळी मी त्यांनी माझ्या होळीच्या रंगाना घाबरण्या मागचे कारण सांगत होतो. तेवढ्यात एका रुममधून अभिषेक बाहेर आला आणि त्यांने मला उचलून रंगांनी भरलेल्या पाण्याच्या पूलमध्ये फेकले. त्याप्रसंगानंतर मी आजपर्यंत कधीच होळी खेळलो नाही. ALSO READ : करण जोहरला नकार देणे प्रभासला पडले महाग! ‘साहो’ अडचणीत!!करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत तयार होणाऱ्या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्टची जोडी पहिल्यांदाच झळकणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रणबीर आणि आलिया यांच्या काही तरी शिजत असल्याची चर्चा होती. मात्र चित्रपट हिट करण्यासाठी करण जोहरची ही मार्केटिंग स्ट्रॅटीजी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर या अफवांमुळे चांगलाच त्रस्त झाला होता. त्यांने करण आणि आलियाला याबाबत चांगलेच सुनावले देखील होते असे कळतेय.