Join us  

करण जोहर सांगतोय हा चित्रपट आहे माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 9:00 PM

करण जोहर आज एक यशस्वी दिग्दर्शक, निर्माता आहे. त्याने आजवर अनेक चित्रपट दिग्दर्शित, निर्मित केले असले तरी त्याच्यासाठी एक चित्रपट खूप खास असल्याचे त्याने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगद्वारे नुकतेच सांगितले आहे.

ठळक मुद्देकरण जोहरने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर कल होना हो या चित्रपटाच्या मेकिंगचा व्हिडिओ पोस्ट करून हा चित्रपट माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा असल्याचे म्हटले आहे. या चित्रपटाला नुकतीच १५ वर्षं पूर्ण झाली असल्याचे देखील त्याने या पोस्ट मध्ये म्हटले आहे. या व्हिडिओद्वारे या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेच्या आठवणींना त्याने उजाळा दिला आहे. कल होना हो या चित्रपटात शाहरुख खान, सैफ अली खान, जया बच्चन, दारा सिंग आणि प्रिती झिंटा यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटात शाहरुख खान एका वेगळ्या अंदाजात त्याच्या फॅन्सना पाहायला मिळाला होता.

करण जोहरने दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात तो साहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिकेत झळकला होता. त्यानंतर त्याने कछ कुछ होता है हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्याचा दिग्दर्शकीय क्षेत्रातील हा पहिलाच चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. या चित्रपटानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याने कभी खुशी कभी गम, कभी अलविदा न कहना यांसारख्या अनेक सरस चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तो आज एक यशस्वी दिग्दर्शक, निर्माता आहे. त्याने आजवर अनेक चित्रपट दिग्दर्शित, निर्मित केले असले तरी त्याच्यासाठी एक चित्रपट खूप खास असल्याचे त्याने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगद्वारे नुकतेच सांगितले आहे.

करण जोहरने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर कल होना हो या चित्रपटाच्या मेकिंगचा व्हिडिओ पोस्ट करून हा चित्रपट माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा असल्याचे म्हटले आहे. या चित्रपटाला नुकतीच १५ वर्षं पूर्ण झाली असल्याचे देखील त्याने या पोस्ट मध्ये म्हटले आहे. या व्हिडिओद्वारे या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेच्या आठवणींना त्याने उजाळा दिला आहे. कल होना हो या चित्रपटात शाहरुख खान, सैफ अली खान, जया बच्चन, दारा सिंग आणि प्रिती झिंटा यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटात शाहरुख खान एका वेगळ्या अंदाजात त्याच्या फॅन्सना पाहायला मिळाला होता. या चित्रपटाची कथा, गाणी, कलाकारांचे अभिनय सगळे प्रेक्षकांना प्रचंड भावले होते. या चित्रपटाला अनेक फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. त्याचसोबत या चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले होते. या चित्रपटाच्या गाण्यांसाठी शंकर-एहसान-लॉय यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार तर सोनू निगमला सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला होता.

करण जोहरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. चार लाखांहून अधिक व्ह्यूज या व्हिडिओला काहीच तासांत मिळाले आहे. हा चित्रपट आमचा देखील खूपच आवडता चित्रपट असल्याचे फॅन्स प्रतिक्रियांद्वारे सांगत आहेत. 

टॅग्स :करण जोहरशाहरुख खानप्रीती झिंटा