Join us  

'झुमका गिरा रे' फेम साधना अन् करण जोहरचं कनेक्शन काय? 'रॉकी और रानी'मध्ये गाणं रिक्रिएट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 4:58 PM

'मेरा साया' सिनेमातील 'झुमका गिरा रे' गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे.

फिल्ममेकर करण जोहर (Karan Johar) बऱ्याच वर्षांनी पुन्हा दिग्दर्शनात परतला आहे. त्याने दिग्दर्शित केलेला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमा या महिन्यात प्रदर्शित होतोय. आलिया भट आणि रणवीर सिंग सिनेमात मु्ख्य भूमिका साकारत आहेत. दरम्यान सिनेमातील एक गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं. 'झुमका गिरा रे' (Jhumka Gira Re) या आयकॉनिक गाण्याचं रिक्रिएटेड व्हर्जन 'व्हॉट झुमका' (What Jhumka) सिनेमात घेण्यात आलं आहे. पण करणने हेच गाणं का निवडलं असावं असा प्रश्न पडतो. 1966 साली आलेल्या 'मेरा साया' सिनेमातील 'झुमका गिरा रे' गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. अभिनेत्री साधना वर हे आयकॉनिक गाणं चित्रित करण्यात आलंय. पण अभिनेत्री साधना (Sadhana) आणि करण जोहर यांच्यात एक कनेक्शन आहे. करण जोहरचे वडील यश जोहर यांना साधना राखी बांधत असे. यश जोहर यांनी साधनाला बहीण मानलं होतं. त्यामुळे साधना करण जोहरची आत्या झाली. त्यामुळे करणने त्यांचं आयकॉनिक गाणं  रिक्रिएट करणं स्वाभाविकच आहे. हे गाणं चाहत्यांच्याही पसंतीस पडलंय.

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' 28 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. सिनेमात जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आजमी हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. चाहते सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी चाहत्यांच्या पसंतीस पडली आहेत.

टॅग्स :करण जोहरआलिया भटरणवीर सिंग