Join us

​करण बनला फोटोग्राफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 21:51 IST

बॉलिवूडला व्यापून टाकणारा दिग्दर्शक म्हणजे करण जोहर. बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शक असलेल्या करणचा आणखी एक गुण समोर आला. तो म्हणजे ...

बॉलिवूडला व्यापून टाकणारा दिग्दर्शक म्हणजे करण जोहर. बॉलिवूडमधील यशस्वी दिग्दर्शक असलेल्या करणचा आणखी एक गुण समोर आला. तो म्हणजे फोटोग्राफी. करण फोटोग्राफी गंभीरपणे घेतोय, असे वाटतयं. किमान सोशल मीडियावर त्याने पोस्ट केलेल्या एका फोटोवरून तरी तसे वाटतेय. ४३ वर्षांच्या करणच्या कॅमेºयातून साकारलेले एक सुरेख छायाचित्र त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे. ‘माय अटेम्ट अ‍ॅट फोटोग्राफी’ असे कॅप्शन त्याने याखाली लिहिलेले. विशेष म्हणजे करणच्या फोटोग्राफीसाठी त्याचा पहिला मॉडेल बनला आहे, आपला रणबीर कपूर. अर्थातच हा फोटो पाहून करणने फोटोग्राफी गंभीरपणे घ्यायलाच हवी, असे वाटतेय. तेव्हा तुम्हीही बघाच...