Join us

'हे' आहे करण आणि अजयच्या भांडणाचे खरे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 12:25 IST

करण जोहर आणि अजय देवगण यांच्यामध्ये बॉलीवूडमधील सर्वात मोठे ‘स्टार वॉर’ सुरू आहे. दोघांचेही सिनेमे - ‘ऐ दिल है ...

करण जोहर आणि अजय देवगण यांच्यामध्ये बॉलीवूडमधील सर्वात मोठे ‘स्टार वॉर’ सुरू आहे. दोघांचेही सिनेमे - ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि ‘शिवाय’ - दिवाळ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत असून रुपेरी पडद्यावर आणि पडद्याबाहेरही युद्ध रंगण्यास सुरूवात झाली आहे.वरकरणी हा वाद ‘बॉक्स आॅफिस’ क्लॅशमुळे होत असावा असे वाटत असले तरी यामागे खरे कारण काही वेगळेच आहे. विशेष म्हणजे ते कारण व्यवसायिक किंवा चित्रपटांशी संबंधित नूसन वैयक्तिक आहे. त्यामुळे तर दोघांचा वाद शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत.वादाची ठिणगी पडली ती दीड वर्षांपूर्वी एका पार्टीमध्ये. करण आणि काजोल किती जिवलग मित्र आहेत हे काही वेगळे सांगणे नको; परंतु त्या पार्टीमध्ये करणने काजोलविषयी तिच्या माघारी तिखट टिप्पणी केली आणि ती अजयला समजली.दोस्त दोस्त ना रहा : काजोल आणि करण जोहरअजयने लगेच त्याला फोन करून याविषयी नाराजी व्यक्त केली. तेव्हापासून अजय-काजोल आणि करणचे संबंध दूरावले गेले. आपल्या बेस्ट फ्रेंडच्या अशा वागण्याने काजोलसुद्धा खूप दुखावली गेली. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की, ती हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न का करत नाही तर त्यामागे हे कारण आहे.गेल्या महिन्यात अजयने करणवर ‘शिवाय’ची बदनामी करण्यासाठी कमाल आर. खानला २५ लाख रुपये दिल्याचा आरोप केला होता. पुरावा म्हणून त्याने केआरकेसोबत झालेले संभाषणच सोशल मीडियावर शेअर केले होते. तेव्हापासून ‘ऐ दिल...’ आणि ‘शिवाय’च्या युद्धाला प्रारंभ झाला.तसे पाहिले गेले तर अजय आणि करण अँड कंपनीशी तसे कधी पटलेच नाही. काजोलचे दोन्ही बेस्ट फ्रेंड - करण आणि शाहरुख - यांच्यासोबत अजयचे वाद झाले आहेत. २०१२ साली ‘जब तक है जान’ वि. ‘सन आॅफ सरदार’ क्लॅशमुळे शाहरुख-अजयचे मीडिया वॉर झाले होते.