Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपूर खानदानच्या या दोन मुलींचे आहे पक्के वैर; एकमेकींचे तोंडही बघणे पसंत करीत नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 21:45 IST

हे सर्वांनाच माहिती आहे की, बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या कपूर परिवारातील मुली आणि सुनांना चित्रपटात काम करण्यास कुठल्याच प्रकारची बंदी ...

हे सर्वांनाच माहिती आहे की, बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या कपूर परिवारातील मुली आणि सुनांना चित्रपटात काम करण्यास कुठल्याच प्रकारची बंदी नाही. त्यामुळेच लग्नानंतरही करिश्मा आणि करिना कपूर काम करताना दिसत आहेत. मात्र यास कपूर परिवारातील एक मुलगी अपवाद आहे. होय, रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर ही नेहमीच स्क्रीनपासून दूर राहिली आहे. ती एक बिझनेस वुमन आहे. तिचा ज्वेलरी आणि फॅशन डिझायनिंगचा बिझनेस आहे. त्याचबरोबर रिद्धिमाशी संबंधित एक बातमीही नेहमीच चर्चेचा विषय ठरत आली आहे. होय, तिची आणि करिश्मा कपूरचे अजिबातच जमत नाही. दोघींमध्ये अशी काही खुन्नस आहे की, त्या एकमेकींचे तोंडही बघणे पसंत करीत नाहीत. इंडस्ट्रीमध्ये कपूर परिवार खूप मोठा आहे. यातील काही तर अतिशय जवळचे नातेवाइक आहेत. परंतु अशातही ते एकमेकांना पसंत करीत नाही. रिपोर्ट्सनुसार या परिवाराच्या बबिता आणि नीतू सिंह या दोन सुनांची कधीच आपसात बनली नाही. दोघी एकमेकींशी बोलणे तर सोडाच, पण एकमेकींचा चेहराही बघणे पसंत करीत नाहीत. याच कारणामुळे त्यांच्या मुलींचेही एकमेकींशी पटत नाही. नितू सिंहची मुलगी रिद्धिमा, तर बबिताची मुलगी करिश्मा आहे. असे म्हटले जाते की, लहानपणी या दोघींमध्ये चांगले संबंध होते. मात्र जसजशा या दोघी मोठ्या होत गेल्या तशी त्यांच्यातील वैर वाढत गेले. याचे एकमेव कारण म्हणजे दोघींच्याही मम्मीमधील दुश्मनी होय. यांच्यात एवढे वैर आहे की, चुकीन या दोघी एखाद्या इव्हेंटमध्ये सहभागी झाल्या तर त्या एकमेकांना बघणेही पसंत करीत नाहीत. वास्तविक रिद्धिमाचा भाऊ रणबीर त्याच्या दोन्ही चुलत बहिणी करिश्मा आणि करिनाच्या क्लोज आहे. खरं तर सुरुवातीला करिना-करिश्मा रिद्धिमा आणि रणबीरसोबत बोलत नसायच्या. परंतु हळूहळू रणबीर करिना आणि करिश्माच्या क्लोज येत गेला. मात्र यामुळे रिद्धिमा आणि करिश्मातील दुरावा कमी झाला नाही. उलट तो वाढतच गेला. काही महिन्यांपूर्वी माध्यमांमध्ये ही बातमी आली होती की, रिद्धिमाने करिश्माचा पूर्व पती संजय कपूरची पत्नी प्रिया सचदेव हिच्याशी जवळिकता वाढविली. आता त्या दोघी मिळून ज्वेलरीचा बिझनेस करीत आहेत. मात्र रिद्धिमाच्या या कृत्यामुळे करिश्मासोबतची तिची दुश्मनी आणखीनच गडद झाली. काही महिन्यांपूर्वीच रिद्धिमाने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, तिला करिश्माविषयी काहीच प्रॉब्लेम नाही. रिद्धिमाला लहानपणापासूनच अभिनयात रस नाही. तिला सिंगिंग आणि फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करायचे होते. आज रिद्धिमाने फॅशन इंडस्ट्रीमध्ये नाव कमाविले आहे. फॅशन डिझायनिंग व्यतिरिक्त ती ज्वेलरी डिझाइनही करते. रिद्धिमाने दिल्लीतील एका बिझनेसमॅन भरत साहनी याच्यासोबत लग्न केले. दोघांचे लग्न लंडनमध्ये पार पडले होते. दोघांनी एकमेकांना तीन वर्ष डेटिंग केल्यानंतर २००६ मध्ये लग्न केले.