सुनील ग्रोवरसोबतच्या वादावर बोलला कपिल शर्मा; म्हणे,‘इतना तो चलता है...’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2017 11:01 IST
कॉमेडियन कपिल शर्मा आणि त्याचा टीममेट सुनील ग्रोवर यांच्यातील वाद आणि मारहाणीच्या बातमीने काल सगळ्यांचेच लक्ष वेधले. मीडियाने या ...
सुनील ग्रोवरसोबतच्या वादावर बोलला कपिल शर्मा; म्हणे,‘इतना तो चलता है...’
कॉमेडियन कपिल शर्मा आणि त्याचा टीममेट सुनील ग्रोवर यांच्यातील वाद आणि मारहाणीच्या बातमीने काल सगळ्यांचेच लक्ष वेधले. मीडियाने या बातमीला ठळकपणे प्रसिद्धी दिल्यानंतर कपिल शर्मा कदाचित भानावर आलाय. होय, कारण या सगळ्या प्रकरणावर त्याने एक आॅफिशिअल स्टेटमेंट जारी केले आहे.तीन दिवसांपूर्वी आॅस्ट्रेलियातील सिडनी आणि मेलबर्नमधील शो संपवून मुंबईत परत येत असताना कपिलने त्याच्या शोमध्ये डॉ. गुलाटी आणि रिंकू भाभीची भूमिका साकाणा-या सुनील ग्रोवरला मारहाण केली. तू माझा नोकर आहेत. तुझा शो फ्लॉप आहे, तू फ्लॉप आहे, असं काय काय ते कपिल दारूच्या नशेत सुनीलला बोलून गेला. यामुळे सुनील खूप दुखावल्याचे वृत्त पाठोपाठ मीडियात उमटले.सुनील कपिलचा शो सोडणार, अशीही बातमी आली. कदाचित यानंतर कपिलचे धाबे दणाणले. कारण या संपूर्ण प्रकारानंतर ‘इतना तो चलता है...’ असे सांगत कपिलने सावरासावर करण्याचा प्रयत्न केला आहे.ALSO READ :shocking !! कपिल शर्मा सुनील ग्रोवरला म्हणाला, तू माझा नोकर; विमानात केली मारहाण!सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट लिहून कपिलने आपली बाजू मांडली. यात तो लिहितो, आयुष्यात एक चांगला काळ अनुभवत असताना माझ्या व सुनील पाजीत झालेल्या मारहाणीची बातमी वाचून मला धक्का बसला. यावर काहीही खुलासा करण्याआधी, ही बातमी कुठून फुटली आणि तिचा उद्देश काय, हे समजून घेतले पाहिले. काही लोकांना छोट्या गोष्टींचा बाऊ करण्याची खोड असते. सुनील व मी एकत्र जेवतो, एकत्र प्रवास करतो. मी स्वत:च्या भावाला वर्षातून एकदा भेटतो. पण सुनील मला रोज भेटतो. माझा बहुतांश वेळ माझ्या टीमसोबत जातो. मी सुनीला आदर करतो. आमच्यात वाद झाला, हे कबुल आहे. पण वाद कुठे होत नाहीत? आम्हीही सामान्य व्यक्ति आहोत. एक कलाकार आणि एक व्यक्ती म्हणून सुनीलबद्दल माझ्या मनात अपार आदर आहे, असे कपिलने लिहिले आहे. सोबतच मीडियाला दुसºया महत्त्वपूर्ण मुद्यांकडे लक्ष देण्याचा सल्लाही दिला आहे. सुनील व माझे भांडण इतके मोठे नाही की, मीडियाने देशातील सगळे ज्वलंत मुद्दे सोडून त्याला प्रसिद्धी द्यावे. मीडिया महत्त्वपूर्ण गोष्टींकडे दुर्लक्ष करून आमच्यावर का लक्ष ठेवतोय? असा सवालही कपिलने केला आहे.