कपिल शर्माने केले जॅकलीनशी लग्न !!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 13:02 IST
शिर्षक वाचून दचकलात ना! हो हे खरे आहे, कपिलने जॅकलीन फर्नांडीस या बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न केले आणि तिच्या आईने ...
कपिल शर्माने केले जॅकलीनशी लग्न !!!
शिर्षक वाचून दचकलात ना! हो हे खरे आहे, कपिलने जॅकलीन फर्नांडीस या बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न केले आणि तिच्या आईने दोघांना आशिर्वाददेखील दिला. मात्र हा लग्नसोहळा पार पडला तो, ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवर. जॅकलीन टायगर श्रॉफसोबत तिच्या आगामी सिनेमा 'अ फ्लाइंग जट'च्या प्रमोशनसाठी आली होती. या दरम्यान सिनेमा आणि शोच्या टीमने भरपूर मज्जा केली. कपिल आणि जॅकलीनच्या विवाह देखील एक मज्जेचा विषय ठरला.