Join us  

रणवीर सिंहसह ८३ चित्रपटाच्या टीमला कपिल देव यांचा कानमंत्र, 'हे' मराठी कलाकारही साकारणार दिग्गज क्रिकेटर्सच्या भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2019 2:33 PM

रणवीर आणि ८३ चित्रपटाची संपूर्ण टीम शुटिंगमध्ये बिझी आहे. नुकतंच १९८३ वर्ल्डकप विजेता कॅप्टन कपिल देव यांनी धर्मशाला इथे हजेरी लावली.

ठळक मुद्देकपिल रणवीर आणि संपूर्ण टीमला क्रिकेटमधील बारकावे शिकवणार आहे. रणवीरच्या टीमला रणवीर डेव्हिल्स म्हटलं जाईल. रणवीर सिंह या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे.

क्रिकेट वर्ल्डकप १९८३ भारतासाठी विशेष होता. बलाढ्य वेस्ट इंडिज टीमला फायनलमध्ये चारीमुंड्या चीत करत कपिल देव यांच्या नेतृत्वातील भारतीय टीमने वर्ल्डकप जिंकण्याचा भीमपराक्रम केला होता. या ऐतिहासिक विजयामुळे तमाम भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. कपिल देव यांच्या त्या भारतीय टीमचं नाव सुवर्णाक्षरांनी क्रिकेट इतिहासात नोंदवलं गेलं. आता भारतीय क्रिकेट टीमचा पहिला वर्ल्डकप जिंकल्याचा हाच पराक्रम रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. ८३ नावाचा हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. अभिनेता रणवीर सिंह या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. सध्या ८३ या चित्रपटाचं शुटिंग धर्मशाला इथं सुरू आहे. 

रणवीर आणि ८३ चित्रपटाची संपूर्ण टीम शुटिंगमध्ये बिझी आहे. नुकतंच १९८३ वर्ल्डकप विजेता कॅप्टन कपिल देव यांनी धर्मशाला इथे हजेरी लावली. इथं कपिल रणवीर आणि संपूर्ण टीमला क्रिकेटमधील बारकावे शिकवणार आहे आणि १९८३च्या आठवणी शेअर करणार आहे. बुधवारी रणवीरनं धर्मशाला स्टेडिअमवर बॉलिंग करत चांगलाच घाम गाळला. १९८३च्या टीमला कपिल डेव्हिल्स म्हटलं जायचं तर रणवीरच्या टीमला रणवीर डेव्हिल्स म्हटलं जाईल. 

रणवीर आणि चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट १५ दिवस इथं एकत्र राहतील, क्रिकेटचे बारकावे शिकतील. एकमेकांना समजून घेता यावं यासाठी सगळे एकत्र वेळ घालवणार आहेत. सगळे एक टीम समजून राहतील, समजून घेतील त्यामुळे शुटिंग करतानाही फार अडचणी येणार नाहीत असा विश्वास चित्रपटाच्या टीमला आहे. ८३ या चित्रपटातील वर्ल्ड चॅम्पियन क्रिकेटर्सची नावंही आता समोर आली आहेत. पाहूया कोण कोणत्या क्रिकेटरची भूमिका साकारणार आहे.

कपिल देव - रणवीर सिंह

क्रिश श्रीकांत - साऊथ स्टार जीवा

बलविंदरसिंग संधू - अमन विर्क (पंजाबी अभिनेता गायक)

रवी शास्त्री - धारिया कारवा (उरी फेम कॅप्टन चंडोक)

संदीप पाटील - चिराग पाटील 

दिलीप वेंगसरकर - आदिनाथ कोठारे

सुनील गावस्कर - ताहिर राज भसीन

सय्यद किरमाणी - साहिल खट्टर

रॉजर बिन्नी -  विजय वर्मा

मोहिंदर अमरनाथ - साकिब सलीम

यशपाल शर्मा - जतीन सरना

सुनील वाल्सन - आर बद्री

मदनलाल - हार्डी संधू

पी.आर.मानसिंह (मॅनेजर) - पंकज त्रिपाठी

टॅग्स :रणवीर सिंगकपिल देव८३ सिनेमा