Join us

​ कन्नड अभिनेता गुरु जग्गेश याच्यावर चाकू हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 15:30 IST

कन्नड अभिनेता गुरु जग्गेश याच्यावर एका अज्ञात व्यक्तीने चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. गुरु जग्गेश मुलाला शाळेत सोडायला ...

कन्नड अभिनेता गुरु जग्गेश याच्यावर एका अज्ञात व्यक्तीने चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. गुरु जग्गेश मुलाला शाळेत सोडायला जात असताना, त्याच्यावर हा हल्ला झाला. दरम्यान गुरुची प्रकृती धोक्याबाहेर आहे.एक अज्ञात व्यक्ती वेगाने आला. गुरु सावध होता. या वेगाने आलेल्या व्यक्तीला गुरूने टोकले. यानंतर त्या व्यक्तीने गुरूच्या मांडीवर चाकूने वार केला. या अनपेक्षित हल्ल्याने गुरु गांगरून गेला. याचदरम्यान आरोपीने पळ काढला.  गुरूला जखमी अवस्थेत रूग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.गुरूचे वडील व अभिनेते जग्गेश यांनी या घटनेबद्दल मीडियाला माहिती देताना त्यांनी सांगितले की, गुरु मुलाला सोडायला निघाला होता. त्याचवेळी ही घटना घडली. गुरुचे कुणासोबतही वैर नाही.२००९ मध्ये आलेल्या ‘गिल्ली’ या कन्नड चित्रपटाने गुरुला खरी ओळख मिळवून दिली. १९९४ मध्ये ‘बेडा किष्णा’ या चित्रपटाद्वारे त्याने त्याने त्याच्या अभिनयाची कारकिर्द सुरु केली. या चित्रपटात गुरुचे वडील जग्गेश यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.२००२ मध्ये वडिलांच्या ‘मेकअप’ या चित्रपटाची कथा गुरुने लिहिली होती. २०१२ मध्ये वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या ‘गुरू’ या चित्रपटात तो दिसला.  बेंगळुरूमध्ये जन्मलेल्या गुरुचे वडिल जग्गेश हेही लोकप्रीय कन्नड अभिनेते आहे.  त्याचे काका कोमल हेही कन्नड सिनेमातील मोठे नाव आहे. २०१४ मध्ये गुरुने विदेशी गर्लफ्रेन्ड केटी पायल हिच्याशी लग्न केले. त्यांचा अर्जुन नावाचा एक मुलगा आहे.