Join us

​कंगना-रंगोली कव्हरपेजवर... बोलून दाखवली वेदना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 08:16 IST

एका लोकप्रीय मॅगझीनच्या कव्हरपेजवर सध्या अभिनेत्री कंगना रनौट आणि तिची बहीण रंगोली या दोघींचे छायाचित्र झळकत आहे. यानिमित्ताने प्रथमच ...

एका लोकप्रीय मॅगझीनच्या कव्हरपेजवर सध्या अभिनेत्री कंगना रनौट आणि तिची बहीण रंगोली या दोघींचे छायाचित्र झळकत आहे. यानिमित्ताने प्रथमच रंगोलीने भोगलेले दु:ख, वेदना, नैराश्य जगापुढे आले आहे. २००६ मध्ये रंगोलीवर अ‍ॅसिड अटॅक झाला होता. या घटनेनंतर रंगोलीला प्रचंड दु:ख, वेदना आणि ५७ आॅपरेशनमधून जावे लागले. एका मुलाखतीत रंगोलीने आपली ही दु:खान्तिका बोलून दाखवली. माझ्या डोळ्यांची ९० टक्के दृष्टी गेली. माझा एक ब्रेस्ट खराब झाला. अ‍ॅसिड हल्ल्यानंतर मला श्वास घ्यायला प्रचंड वेदना व्हायच्या. कारण श्वसननलिकेला डॅमेज झाली होती. आयुष्याच्या प्रत्येक श्वासासाठी माझा संघर्ष सुरु होता. आॅपरेशन..प्लॅस्टिक सर्जरीही सोपी नव्हती. तीन महिने आरशासमोर उभे राहण्याची हिंमतही मी केली नाही. कंगना त्यावेळी बॉलिवूडमध्ये संघर्ष करीत होती. पण तिने मला आधार दिला. मला नैराश्यातून बाहेर काढले. एक नवे आयुष्य दिले. २३ वर्षांच्या त्या वयात मी भोगलेला शारिरीक आणि मानसिक त्रास कुणाच्याही वाट्याला येऊ नये...असे रंगोलीने या मुलाखतीत सांगितले.