कंगना राणौतने आपल्या योगगुरुला दिली ‘ही’ गुरुदक्षिणा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2017 14:17 IST
कंगना राणौत हिने स्वबळावर बॉलिवूडमध्ये आपले एक अढळ स्थान निर्माण केले आहे. अर्थात तिच्या या यशात अनेक वाटेकरी आहे ...
कंगना राणौतने आपल्या योगगुरुला दिली ‘ही’ गुरुदक्षिणा!!
कंगना राणौत हिने स्वबळावर बॉलिवूडमध्ये आपले एक अढळ स्थान निर्माण केले आहे. अर्थात तिच्या या यशात अनेक वाटेकरी आहे आणि कंगनाला त्याची जाण आहे. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वी कंगनाला जुहू बीचवर एक व्यक्ती भेटली होती. या व्यक्तिचा योगाभ्यास, जिमनॅस्टिक पाहून कंगना इतकी प्रभावित झाली की, तिने त्या व्यक्तीला आपले गुरू मानले. ही व्यक्ती तेव्हापासून कंगनाला योगाचे धडे देतीय. कंगनाच्या या योग गुरूचे नाव आहे, सूर्य नारायण सिंह. आपल्या या गुरुला कंगनाने २ कोटी रूपयांचा फ्लॅट भेट म्हणून दिला आहे. या २ बीएचके फ्लॅटमध्ये एक शानदार बाल्कनी आहे. याठिकाणी सूर्य नारायण सिंह योग क्लासेस घेऊ शकणार आहेत.कंगनाने हे घर गुरुदक्षिणा म्हणून सूर्यनारायण यांना दिले आहे. प्रत्येक वळणावर सूर्यनारायण यांनी कंगनाला मजबूत आधार दिला. विशेष म्हणजे, या मोबदल्यात कुठलीही अपेक्षा केली नाही. मग कंगनाला स्वत:च त्यांच्यासाठी काहीतरी मनापासून करावेसे वाटले आणि तिने त्यांना हा फ्लॅट भेट म्हणून दिला. कंगनाने केवळ एवढेच केले नाही तर या घरात एक उत्तम योग सेंटर बनवण्यासाठीही सूर्यनारायण यांची मदत केली. या सेंटरमध्ये पर्सनल लॉकरपासून तर अनेक आरोग्य सुविधांपर्यंत अनेक गोष्टी आहेत.ALSO READ : कंगना राणौत लाटू पाहतेय ‘सिमरन’च्या लेखकाचे श्रेय? वाचा काय आहे प्रकरण!स्वत: कंगनाही २ कोटी रूपयांच्या फ्लॅटमध्ये राहते. आपल्या बहीणीलाही कंगनाने लग्नाची भेट म्हणून फ्लॅट गिफ्ट केला होता. एकंदर काय तर कंगना बरीच दिलदार आहे. लवकरच कंगनाचा ‘सिमरन’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. याशिवाय ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’मध्ये ती दिसणार आहे.